खळबळजनक खुलासा! हॉटेलच्या रुममध्ये होता छुपा कॅमेरा, अभिनेत्रीला आला वाईट अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 04:25 PM2023-08-22T16:25:20+5:302023-08-22T16:28:08+5:30

अभिनेत्रीला हॉटलेच्या खोलीत आलेल्या वाईट अनुभवामुळे तिला खूप मोठा धक्का बसला होता.

अभिनेत्री क्रिती खरबंदाने नुकताच खुलासा केला होता की, एकदा तिच्यासोबत अशी घटना घडली होती ज्याने तिला खूप धक्का बसला होता.

क्रिती खरबंदा हिने नुकताच स्वतःशी संबंधित एक प्रसंग सांगितला. क्रितीने सांगितले की, अभिनेत्री एकदा हॉटेलमध्ये थांबली होती जेव्हा तिच्यासोबत ही भयानक घटना घडली.

क्रितीने सांगितले की, मी माझ्या एका कन्नड चित्रपटाच्या शूटिंगसाठी आऊटडोअर होते. मी ज्या हॉटेल रूममध्ये राहत होतो त्या हॉटेलमध्ये काम करणारा एक माणूस होता ज्याने त्याचा कॅमेरा माझ्या खोलीत सोडला होता.

मी थकून रूमवर आलो, पण मला आणि माझ्या स्टाफला ही सवय आहे की आम्ही आधी रूम चेक करतो. त्या तपासणीत सेट टॉप बॉक्सच्या मागे एक कॅमेरा लपवून ठेवलेला असल्याचे आढळून आले.

तो इतका जाणकार वाटत नव्हता, कारण त्याने कॅमेरा लपवून ठेवण्याची पद्धत अतिशय वाईट होती, असे क्रितीने सांगितले.

पण ही घटना माझ्यासाठी खूप भीतीदायक होती. दिवसभर थकून तुम्ही हॉटेलवर पोहोचता आणि इथेच हे घडते, हे धोकादायक आहे.