बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ताने शेअर केला बॉयफ्रेंडचा फोटो, पहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2020 18:47 IST2020-04-29T18:47:57+5:302020-04-29T18:47:57+5:30

लॉकडाउनमध्ये अभिनेत्री ईशा गुप्ताने सोशल मीडियावर बॉयफ्रेंडसोबतचा फोटो शेअर केला आहे.
यासोबतच ईशाने रिलेशनशीपकबद्दल जाहीर केले. ईशा गुप्ताने पहिल्यांदाच रिलेशनशीपबद्दल सांगितले की ती स्पेनच्या एका व्यक्तीला डेट करत आहे.
या फोटोत ते दोघे खूप रोमँटिक दिसत आहे.
http://cms.lokmat.com/node/add/image_collection
खरे तर ईशा गुप्ताच्या रिलेशनशिपची चर्चा याआधीही अनेकदा झाली. क्रिकेटपटू हार्दिक पांड्यासोबतही तिचे नाव जोडले गेले. पण ईशाने प्रत्येकवेळी रिलेशनशिपच्या चर्चा धुडकावून लावल्यात आणि आता मॅन्युअलसोबतचे नाते तिने स्वत:च जगजाहिर केले.
मॅन्युअल हा एक बिझनेसमॅन आहे. तो स्पेनमध्ये राहतो़ काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत ईशा बॉयफ्रेन्डबद्दल बोलली होती.
बॉलिवूडची बोल्ड अॅण्ड ब्युटिफुल अभिनेत्री ईशा गुप्ताला बॉलिवूडची सेनसेशनल अॅक्ट्रेस म्हटले जाते.
सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असलेली ईशा कायम तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते.
२०१२ मध्ये ‘जन्नत2’ द्वारे ईशाने बॉलिवूड डेब्यू केला होता. या पहिल्याच चित्रपटासाठी ईशाला फिल्मफेअर पुरस्कारात बेस्ट फिमेल डेब्यूचे नॉमिनेशन मिळाले होते.