राज कपूर यांच्या 'मेरा नाम जोकर'मधली रुसी अभिनेत्री सेनिया आठवतेय का? ५५ वर्षांनंतर आता दिसते अशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 17:21 IST2025-12-04T17:17:38+5:302025-12-04T17:21:22+5:30

'मेरा नाम जोकर' (Mera Naam Joker) या चित्रपटात मरीनाचे (Marina) पात्र साकारणाऱ्या रशियन अभिनेत्री सेनिया (Kseniya) आता ७५ वर्षांच्या झाल्या आहेत.

१९७० साली रिलीज झालेला राज कपूर यांचा चित्रपट 'मेरा नाम जोकर'मध्ये रशियन अभिनेत्री सेनिया रियाबिनकिना (Kseniya Ryabinkina) महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसल्या होत्या.

सेनिया यांनी सर्कसमध्ये काम करणाऱ्या 'मरीना' नावाच्या मुलीची महत्त्वाची भूमिका साकारली होती आणि आपल्या सौंदर्याने चाहत्यांची मने जिंकली होती.

आता सेनिया यांचा ५५ वर्षांनंतर लूक बदलला आहे. त्यांना आता ओळखणं कठीण झालं आहे.

तुम्हाला माहीत आहेच की 'मेरा नाम जोकर'मधील मरीनाचे पात्र एका रशियातून भारतात आलेल्या मुलीचे आहे, जी सर्कस करायला येते. इथेच राजू म्हणजेच राज कपूरला तिच्यावर प्रेम होते. मरीनालाही राजूवर प्रेम होते. पण, जेव्हा सर्कस संपल्यानंतर मरीना आपल्या देशात परत जाते, तेव्हा त्यांच्या प्रेमकथेचा शेवट होतो. यामुळे राजूचे मन तुटते.

'मेरा नाम जोकर' चित्रपटाला ५५ वर्षे उलटून गेली आहेत. आणि सेनिया देखील आता ७५ वर्षांच्या झाल्या आहेत. तरीही, त्यांचे लेटेस्ट फोटो पाहून चाहते आजही त्यांच्या सौंदर्याचे कौतुक करतात.

त्या आपल्या फिटनेसची काळजी घेण्यासाठी बॅले डान्सदेखील करतात.

तसेच, त्या सोशल मीडियावर आपल्या कुटुंबाचे सुंदर फोटो शेअर करत असतात.