बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला ओळखलंत का?, तडकाफडकी देश सोडून परदेशात झाली स्थायिक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 05:17 PM2022-11-16T17:17:54+5:302022-11-16T17:21:26+5:30

बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला आता ओळखणे कठीण झाले आहे.

आपल्या अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर चित्रपटसृष्टीत नाव कमावणारी १९८० आणि १९९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री १६ नोव्हेंबर रोजी आपला ५९ वा वाढदिवस साजरा करत आहे.

मीनाक्षीने केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर तमिळ आणि तेलगू चित्रपटांमध्येही खूप नाव कमावले आहे.

मिनाक्षी शेषाद्री सोशल मीडियावर चाहत्यांसाठी फोटो शेअर करत असते. पण सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या तिच्या या फोटोंमध्ये तिचे वाढलेले वय दिसून येत आहे.

वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी तिने मिस इंडियाचा ताज जिंकला होता आणि पहिल्यांदा १९८३ मध्ये आलेल्या पेंटर बाबू चित्रपटात काम केले होते.

मीनाक्षी शेषाद्री यांनी अमिताभ बच्चनपासून विनोद खन्ना, ऋषी कपूर, अनिल कपूर आणि इतर अनेकांसह बॉलिवूडच्या जवळपास प्रत्येक सुपरस्टारसोबत काम केले.

१९८३ मधला हिरो हा तिच्या आयुष्यातील सर्वात सुपरहिट चित्रपट होता, ज्यामध्ये तिने जॅकी श्रॉफसोबत काम केले आणि रातोरात ती मोठी स्टार बनली.

सनी देओलसोबतचा त्याचा दामिनी हा चित्रपटही खूप आवडला होता.

मीनाक्षी जेव्हा तिच्या करिअरमध्ये यशाच्या शिखरावर असताना सिनेइंडस्ट्रीला राम राम केला आणि पतीसोबत अमेरिकेत स्थायिक झाली. तिथे भरतनाट्यम, कुचीपुडी, कथ्थक आणि ओडिसी नृत्य शिक्षिका बनली.

घातक या चित्रपटात ती शेवटची दिसली होती. यानंतरही तिला अनेक भूमिकांच्या ऑफर आल्या. पण एका व्यक्तीच्या भीतीमुळे तिने सगळ्या ऑफर्स नाकारल्या. रातोरात सगळं काही सोडून परदेशी रवाना झाली. त्यानंतर ती कधीच भारतात परतली नाही.