'पुष्पा' फेम Allu Arjunच्या पत्नीला पाहिलंत का?, सौंदर्याच्या बाबतीत श्रीवल्लीलाही देते टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2023 01:09 PM2023-01-06T13:09:14+5:302023-01-06T13:13:35+5:30

Allu Arjun : साऊथच्या स्टायलिश स्टार अभिनेता अल्लू अर्जुनने पुष्पा चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. अल्लू अर्जुनच्या पत्नीला पाहिलंत का? तीदेखील सौंदर्यात अभिनेत्रींना देते टक्कर

अल्लू अर्जुन प्रसिद्ध तेलुगू अभिनेता चिरंजीवीचा पुतण्या आहे. अल्लू अर्जुनची पत्नी स्नेहा रेड्डी अतिशय सुंदर आणि यशस्वी व्यावसायिक महिला आहे.

स्नेहा ही व्यापारी केसी शेखर रेड्डी आणि कविता रेड्डी यांची मुलगी आहे. स्नेहाचे वडील इन्स्टिट्यूट ऑफ सायंटिफिक टेक्नॉलॉजी (SIT) चे अध्यक्ष आहेत.

स्नेहा रेड्डी व्यवसाय सांभाळते आणि कुटुंबाला पूर्ण वेळ देते.

स्नेहा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. स्नेहाचे इंस्टाग्रामवर ७.२ मिलियन फॉलोअर्स आहेत.

स्नेहा अनेकदा अल्लू अर्जुन आणि तिच्या दोन मुलांसोबतचे फोटो शेअर करत असते.

स्नेहा आता सोशल मीडियावरील प्रसिद्ध व्यक्तिमत्व बनली आहे. सुंदर आणि ग्लॅमरस असण्यासोबतच ती खूप हुशार देखील आहे.

अमेरिकेत राहून स्नेहा रेड्डी संगणकशास्त्रात पदवी मिळवली आहे.

अल्लू आणि स्नेहा यांची पहिली भेट अमेरिकेत मित्राच्या लग्नात झाली होती.

दोघेही पहिल्याच नजरेत प्रेमात पडले होते.

आधी मैत्री मग प्रेम आणि नंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.