साडीत खुललं दिया मिर्झाचं सौंदर्य, फोटो पाहून चाहते सैराट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2024 17:07 IST2024-04-19T16:40:43+5:302024-04-19T17:07:17+5:30

दिया मिर्झा हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे.
आजही तिने आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनातील आपली जागा कायम ठेवली आहे.
दिया मिर्झा ही सोशल मीडियावर सक्रीय असते. ती विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते.
दिया ही वेस्टर्न आणि मॉडर्न अशा दोन्ही प्रकारचे कपडे अतिशय आत्मविश्वासाने कॅरी करते.
दियाने नुकताच तिचा एक खास लूक शेअर केलाय, ज्यात तिने एक सुंदर साडी नेसलीये.
दियाची ही साडी खूपच सुंदर दिसत आहे. या लुकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
कानात मोठे झुमके घालून तिने हा लूक पूर्ण केला आहे.
मोठी बॉर्डर असलेल्या या साडीवर दियाने मॅचिंग ब्लाउज परिधान केलं आहे. तिचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.
दियाने 19 ऑक्टोबर 2001 रोजी प्रदर्शित झालेल्या 'रेहना है तेरे दिल में' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
'दीवानापन', 'तुमको ना भूल पायेंगे', 'दम', 'परिणीता', 'लगे रहो मुन्नाभाई' आणि 'संजू' या हिट चित्रपटांमध्ये दियानं काम केलं.