सलमान-इमरान नाही तर 'धुरंधर २: द रिव्हेंज'मध्ये दाऊद इब्राहिम बनला 'हा' अभिनेता, नाव ऐकून चकित व्हाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 11:54 IST2026-03-19T11:43:13+5:302026-03-19T11:54:05+5:30
'धुरंधर'मध्ये 'बडे साहब' या नावाचा उल्लेख करण्यात आला होता. अखेर 'धुरंधर २: द रिव्हेंज'मध्ये त्या अभिनेत्यावरुन पडदा हटला आहे.

दिग्दर्शक आदित्य धर आणि अभिनेता रणवीर सिंग यांच्या बहुचर्चित 'धुरंधर २: द रिव्हेंज' (Dhurandhar The Revenge) या चित्रपटाच्या मोठी चर्चा होती. आज हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

स्पाय थ्रिलर 'धुरंधर २: द रिव्हेंज'ची कथा, ॲक्शन सीन आणि गाण्यांव्यतिरिक्त आणखी एका गोष्टीची विशेष प्रशंसा होत आहे, ती म्हणजे सिनेमाची स्टार कास्ट.

हमजा या भूमिकेत रणवीर सिंग असो किंवा मेजर इकबालच्या भूमिकेत अर्जुन रामपाल असो आदित्य धरच्या या चित्रपटात प्रत्येक कलाकाराने आपल्या अभिनयाने जीव ओतला आहे.

पहिल्या भागात म्हणजेच 'धुरंधर'मध्ये 'बडे साहब' या पात्राचा उल्लेख करण्यात आला होता. या पात्राला पाहण्यासाठी प्रेक्षक दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत होते.

चित्रपट यशस्वी झाल्यानंतर सोशल मीडियावरही चर्चा रंगली होती की, 'धुरंधर २: द रिव्हेंज'मध्ये 'बडे साहब' कोण साकारणार? (Who Is Dhurandhar 2 Bade Sahab) काहींना वाटत होतं की या भूमिकेत सलमान खान दिसू शकतो, तर काही जण इमरान हाश्मी याचे नाव घेत होते. मात्र, ‘'धुरंधर २: द रिव्हेंज'मध्ये 'बडे साहब' ना सलमान ठरला, ना इमरान.

'धुरंधर २: द रिव्हेंज'मध्ये 'बडे साहब' उर्फ दाऊद इब्राहिमची भूमिका साकारणारा अभिनेता नॅशनल अवॉर्ड विजेता असून त्याने हॉलिवूडमध्येही आपली छाप सोडली आहे.

हा अभिनेता म्हणजे दानिश इकबाल. चित्रपटाची सुरुवातच त्यांच्या पात्राने होते. पहिल्या भागात दाखवण्यात आलं होतं की हमजाचा (रणवीर) पुढचा टार्गेट 'बडे साहब' आहे.

दानिश इकबाल हे नॅशनल अवॉर्ड विजेते अभिनेते असून ते अभिनयासोबत दिग्दर्शन, ट्रेनिंग आणि गीतलेखनही करतात. त्यांना 'महाराणी २' या वेबसीरिजमुळे विशेष प्रसिद्धी मिळाली होती.

'धुरंधर २: द रिव्हेंज'पूर्वी त्यांनी 'संकल्प', 'भक्षक', 'हक' आणि 'आखिरी सच' यांसारख्या प्रोजेक्ट्समध्ये काम केलं आहे. २००७ साली आलेल्या A Mighty Heart या चित्रपटातही त्यांनी भूमिका साकारली होती. या चित्रपटात इरफान खान देखील होते.

आता 'धुरंधर २: द रिव्हेंज'मधील त्यांच्या दमदार भूमिकेमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

















