हेमा मालिनी इतकीच सुंदर दिसते धर्मेंद्र यांची पहिली पत्नी, मग अभिनेत्याने का केलं दुसरं लग्न?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 13:38 IST2025-06-18T13:32:28+5:302025-06-18T13:38:11+5:30
धर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौर हेमा मालिनी इतक्याच सुंदर दिसतात. पण, तरीदेखील धर्मेंद्र हेमा मालिनीच्या सौंदर्याला भुलले.

धर्मेंद्र म्हणजे बॉलिवूडचा चार्मिंग हिरो. अभिनयासोबतच हँडसम दिसणाऱ्या धर्मेंद्र यांनी तरुणींना भुरळ घातली होती. बॉलिवूड करिअरसोबतच ते पर्सनल लाइफमुळेही चर्चेत होते.
धर्मेंद्र आणि हेमा मालिनीची लव्ह स्टोरी प्रचंड गाजली. विवाहित असतानादेखील धर्मेंद्र यांनी हेमा मालिनीशी दुसरं लग्न केलं.
त्यांचं पहिलं लग्न प्रकाश कौर यांच्याशी झालं होतं. १९५४ साली धर्मेंद्र आणि प्रकाश कौर विवाहबंधनात अडकले होते.
धर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौर हेमा मालिनी इतक्याच सुंदर दिसतात. पण, तरीदेखील धर्मेंद्र हेमा मालिनीच्या सौंदर्याला भुलले.
त्यांना हेमा मालिनीशी लग्न करायचं होतं. मात्र, प्रकाश कौर यांनी धर्मेंद्र यांना घटस्फोट देण्यास स्पष्ट नकार दिला होता. त्यामुळे मुस्लीम धर्म स्वीकारून धर्मेंद्र यांनी १९८० साली हेमा मालिनीशी दुसरं लग्न केलं.
धर्मेंद्र यांना पहिली पत्नी प्रकाश कौर यांच्यापासून सनी देओल, बॉबी देओल ही दोन मुलं तर अजेता आणि विजेता या दोन मुली आहेत.
तर हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांना ईशा देओल आणि अहाना देओल या दोन मुली आहेत.