न्यू मॉम दीपिका पादुकोणचा 'क्वीन मूड ऑन'! स्टॉकहोममध्ये अभिनेत्रीचा ग्लॅमरस लूक, पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 12:20 IST2025-05-28T12:14:29+5:302025-05-28T12:20:06+5:30
न्यू मॉम दीपिकाने स्टॉकहोममध्ये पार पडलेल्या एका इव्हेंटला हजेरी लावली होती.

दीपिका पादुकोण ही बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे. काही महिन्यांपूर्वीच दीपिका आई झाली.
न्यू मॉम दीपिकाने स्टॉकहोममध्ये पार पडलेल्या एका इव्हेंटला हजेरी लावली होती.
दीपिका स्वीडनच्या स्टॉकहोममध्ये पार पडलेल्या EN ÉQUILIBRE या कार्टियर हाय ज्वेलरी इव्हेंटमध्ये ती सहभागी झाली होती.
या इव्हेंटसाठी तिने एक रॉयल लाल ड्रेस परिधान केला होता. तर खड्यांची ज्वेलरी घातली होती.
दीपिकाने या इव्हेंटचे काही फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. फोटोतील न्यू मॉम दीपिकाचा लूक पाहून चाहते थक्क झाले आहेत.
तिच्या या ग्लॅमरस फोटोंनी चाहत्यांची मनं जिंकली आहेत. दीपिकाच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
तिचे हे फोटो पाहून दीपिकाने जणू "क्वीन मूड ऑन!" केल्याचं दिसत आहे.
दीपिकाचे केवळ भारतातच नाही तर जगभरात चाहते आहेत. तिच्या अदांवर चाहते फिदा होतात.
दरम्यान दीपिका सध्या 'स्पिरीट' या सिनेमामुळेही चर्चेत आहे. संदीप रेड्डी वांगा यांच्या सिनेमातून दीपिकाला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.