सपना चौधरी नव्हे 'हे' आहे हरियाणवी डान्सरचं खरं नाव; तुम्हाला माहित होतं का?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 10:45 AM2021-12-16T10:45:00+5:302021-12-16T10:45:00+5:30

Sapna chaudhary: वडिलांचं छत्र हरपलेल्या सपनाला खरं तर इन्स्पेक्टर व्हायचं होतं. पण घरची जबाबदारी सांभाळण्याच्या नादात तिचं स्वप्न मागे पडलं.

आपल्या डान्समुळे अनेकांना वेड लावणारी हरियाणवी डान्सर म्हणजे सपना चौधरी (Sapna Chaudhary). आज सपनाकडे डान्सिंग क्वीन म्हणून पाहिलं जातं.

सपना तिच्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल लाइफमुळेही कायम चर्चेत असते. अलिकडेच सपनाने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. त्यामुळे तिच्या पर्सनल लाइफमुळे काय सुरु असतं हे जाणून घेण्याची उत्सुकता कायमच चाहत्यांना असते.

'बिग बॉस ११' मध्ये सपनाने सहभाग घेतला होता.तेव्हापासून तिची लोकप्रियता तुफान वाढली.

कलाविश्वाच्या झगमगाटात वावरणारी सपना कितीही ग्लॅमरस दिसत असली तरीदेखील तिचं बालपण प्रचंड कष्टात आणि मेहनतीमध्ये गेल्याचं सांगण्यात येतं.

विशेष म्हणजे हरियाणवी डान्सर सपना चौधरी या नावाने ओळख निर्माण करणाऱ्या या स्टारचं खरं नाव सपना नसून वेगळंच आहे. आणि, हे फार मोजक्या लोकांना माहित आहे.

सपना ११ वर्षांची असतांना तिच्या वडिलांचं निधन झालं. वडिलांच्या निधनानंतर सपना आणि तिच्या कुटुंबाला मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करावा लागला.

वडिलांचं छत्र हरपलेल्या सपनाला खरं तर इन्स्पेक्टर व्हायचं होतं. पण घरची जबाबदारी सांभाळण्याच्या नादात तिचं स्वप्न मागे पडलं. मात्र, याच कारणामुळे आज तिला देसी क्वीन म्हणून नवी ओळख मिळाली.

हरियाणाच्या नजफगढमध्ये जन्म झालेल्या सपनाने केवळ ८ वी पर्यंतच शिक्षण पूर्ण केलं आगे. त्यानंतर तिने स्टेजवर डान्स परफॉर्मन्स करण्यास सुरुवात केली.

सपनाचं खरं नाव सुष्मिता असं आहे. मात्र, कलाविश्वात येण्यापूर्वी तिने तिचं नाव बदलून सपना असं केलं.

सपना उत्तम डान्सर असण्यासोबतच एक सोशल मीडिया सेन्सेशनदेखील आहे.