Dabboo Ratnani 2020 Calendar : कॅलेंडर लॉन्चला पोहोचलेत सेलिब्रिटी, केली धम्माल मस्ती!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2020 12:56 IST2020-02-18T12:46:22+5:302020-02-18T12:56:33+5:30
सेलिब्रिटी फोटोग्राफर डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरची सगळ्यांनाचं प्रतीक्षा असते. अखेर काल डब्बू रत्नानीचे यंदाचे नवे कोरे कॅलेंडर लॉन्च झाले.

या कॅलेंडर लॉन्चप्रसंगी डब्बू व त्याच्या पत्नीने एकमेकांना किस केले आणि कॅमे-यांनी हा गोड क्षण टीपला.

सदाबहार अभिनेत्री रेखा यांनी अशी धम्माल पोज दिली.

या लॉन्चिंग इव्हेंटला बॉलिवूडच्या अनेक बड्या स्टार्सनी हजेरी लावली. सदाबहार अभिनेत्री रेखा, विद्या बालन, उर्वशी रौतेला, सनी लिओनी असे सगळे यावेळी दिसले.

विद्या बालनने स्टनिंग लूकमध्ये या इव्हेंटमध्ये हजेरी लावली.

सनी लिओनीनेही यावेळी हजेरी लावली. कॅलेंडरसोबत तिने अशी मस्त पोज दिली.

भूमी पेडणेकर हिनेही ग्लॅमरस पोज दिली.

अभिनेत्री उर्वशी रौतेला हिचा अनोखा अंदाज यावेळी पाहायला मिळाला.

छोट्या पडद्याचा स्टार प्रियांश शर्माही यावेळी दिसला.

जॅकी श्रॉफ यांनी लेकाच्या फोटोचे चुंबन घेत आनंद साजरा केला.

















