'मुन्नाभाई MBBS'मधील 'चिंकी'चा लूक पूर्ण बदलला, २२ वर्षांनंतर अशी दिसते संजय दत्तची नायिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 11:51 IST2025-10-18T11:44:59+5:302025-10-18T11:51:56+5:30
Munnabhai MBBS Movie : 'मुन्नाभाई MBBS' चित्रपटात डॉ. सुमन अस्थाना उर्फ 'चिंकी'ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री ग्रेसी सिंगलाही खूप लोकप्रियता मिळाली होती. मात्र, २२ वर्षांनंतर आता ग्रेसीचा संपूर्ण लूक बदलला आहे, तिचे लेटेस्ट फोटो पाहून तुम्ही थक्क व्हाल.

२००३ साली आलेल्या 'मुन्नाभाई M.B.B.S.' या चित्रपटाने अभिनेता संजय दत्तच्या अभिनय कारकिर्दीत एक महत्त्वाचं स्थान मिळवलं आहे. दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता. या चित्रपटातील 'मुन्नाभाई' आणि 'सर्किट' ही पात्रं खूप गाजली.
यासोबतच, चित्रपटात डॉ. सुमन अस्थाना उर्फ 'चिंकी'ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री ग्रेसी सिंगलाही खूप लोकप्रियता मिळाली होती. मात्र, २२ वर्षांनंतर आता ग्रेसीचा संपूर्ण लूक बदलला आहे, तिचे लेटेस्ट फोटो पाहून तुम्ही थक्क व्हाल.
संजय दत्तसोबत 'मुन्नाभाई M.B.B.S.' मध्ये ग्रेसी सिंगने आपल्या अप्रतिम अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती.
'चिंकी' म्हणजे डॉ. सुमन अस्थानाच्या भूमिकेत ती खूप भावली. तिची सुंदरता आणि मनमोहक हास्य कोणाचेही मन जिंकेल असे होते. पण वेळेनुसार आता ग्रेसी सिंगचा लूक पूर्णपणे बदलला आहे.
४५ वर्षांची ग्रेसी आता खूप बदलली आहे. वाढत्या वयाचा परिणाम तिच्यावर स्पष्टपणे दिसत आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे, तिच्या चेहऱ्यावरील तेज अजूनही कमी झालेलं नाही. आपल्या साधेपणाने ती आजही चाहत्यांना प्रभावित करते.
ग्रेसीच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर असलेल्या लेटेस्ट फोटोंवरून याचा अंदाज सहज लावता येतो. एकंदरीत, ग्रेसी सिंग या चित्रपटसृष्टीतील अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, जी साधेपणा आणि सहजतेने प्रत्येकाला प्रभावित करू शकते.
ग्रेसी सिंग आजही अविवाहित आहेत आणि तिने लग्न केलेले नाही. यामागचे कारण समजू शकलेलं नाही. तिच्या अभिनय कारकिर्दीचा विचार केला तर, 'मुन्नाभाई M.B.B.S.'मुळे स्टार बनलेल्या ग्रेसीने अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केले आहे.
लगान, गंगाजल, मुस्कान, अरमान, देख भाई देख या चित्रपटांव्यतिरिक्त ग्रेसीने दीर्घकाळ टीव्ही इंडस्ट्रीतही काम केले आहे. 'संतोषी माँ' हे तिच्या लोकप्रिय मालिकेचं नाव आहे.