हिरव्या रंगाची पैठणी अन् हाय हिल्स! कान्समधील अभिनेत्रीच्या लूकची चर्चा, सोशल मीडियावर होतंय कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2024 16:47 IST2024-05-27T16:42:18+5:302024-05-27T16:47:01+5:30
अनेक बॉलिवूड आणि हॉलिवूड सेलिब्रिटींनी यंदाच्या कान्स फेस्टिव्हलमध्ये जलवा दाखवला. पण, सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते निहारिका रायजादा हिने.

सध्या कान्स फिल्म फेस्टिव्हलची सर्वत्र चर्चा आहे. अनेक बॉलिवूड आणि हॉलिवूड सेलिब्रिटींनी यंदाच्या कान्स फेस्टिव्हलमध्ये जलवा दाखवला. पण, सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते निहारिका रायजादा हिने.
कान्स फेस्टिव्हलमधील सेलिब्रिटींच्या लूकची कायमच चर्चा होते. मराठमोळ्या छाया कदम यांनीही आईची साडी आणि नथ घालून कान्समध्ये लक्ष वेधून घेतलं.
त्यानंतर आता निहारिका रायजादाचा लूक लक्षवेधी ठरत आहे. आंतरराष्ट्रीय कान्स फेस्टिव्हलमध्ये निहारिका पैठणी नेसून पोहोचलेली पाहायला मिळाली.
हिरव्या रंगाची नऊवारी पैठणी आणि मराठमोळा साज करत निहारिकाने रेड कार्पेटवर मराठी ठसका दाखवला.
तिचा कान्स फेस्टिव्हलमधील हा लूक चर्चेषा विषय ठरला आहे. सोशल मीडियावर निहारिकाचं कौतुक होत आहे.
पैठणी नेसून कपाळावर चंद्रकोर लावलेली निहारिका हातात लेदर बॅग घेऊन रॅम्प वॉक करताना दिसून आली.
निकायी फॅशन स्टुडियोने तिचा हा लूक डिझाइन केला होता. कान्स फेस्टिव्हलमधील तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
निहारिकाने अनेक बॉलिवूड आणि साऊथ सिनेमांमध्ये काम केलं आहे.