रणबीर-आलियाच्या 'ब्रह्मास्त्र'ची बंपर कमाई! पहिल्या आठवड्यात चित्रपटानं जगभरात केली इतक्या कोटींची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 04:45 PM2022-09-12T16:45:45+5:302022-09-12T16:45:45+5:30

Brahmastra Movie: रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा ‘ब्रह्मास्त्र’ बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. देशातच नाही तर परदेशातही या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत जगभरात मोठी कमाई केलीय.

'ब्रह्मास्त्र पार्ट वन: शिव'ने पहिल्या वीकेंडला जगभरातील 'बॉक्स ऑफिस'वर एकूण 225 कोटींची कमाई केली आहे.

निर्मात्यांनी सोमवारी ही माहिती दिली. चित्रपटाचे दिग्दर्शक अयान मुखर्जी यांनी 'इन्स्टाग्राम स्टोरी' अपडेटमध्ये चित्रपटाच्या कमाईची माहिती दिली.

रणबीर कपूर आणि आलिया भट स्टारर चित्रपटाला प्रेमाचा वर्षाव केल्यामुळे चित्रपट निर्मात्याने प्रेक्षकांचे आभार मानले. हा चित्रपट ९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे.

यात अभिनेते अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान देखील होते. या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी ७५ कोटी आणि दुसऱ्या दिवशी ८५ कोटींची कमाई केली आहे.

या चित्रपटाच्या निर्मितीसाठी ४०० कोटींहून अधिक खर्च करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. आलिया भटनेही इंस्टाग्रामवर प्रेक्षकांचे आभार मानलेत.