Aryan Khan Arrest News : ज्या लक्झरी क्रूझवर सुरू होती आर्यन खानची पार्टी; जाणून घ्या, किती आहे त्याचा एका रात्रीचा रेन्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2021 10:07 IST2021-10-04T09:56:26+5:302021-10-04T10:07:18+5:30
Bollywood Shahrukh khan son Aryan khan drug case arrested by ncb know about cruise one night price details: आर्यन खान बॉलिवूड सुपर स्टार शाहरुख खानचा मुलगा आहे. तो आलिशान जीवन जगतो. आर्यन खान ज्या क्रूझमध्ये पार्टी करत, ते काही साधारण क्रूझ नव्हते. त्यात अनेक सुविधा होत्या. या जहाजात पार्टी किंवा रात्र घालविण्याचा खर्चही प्रचंड आहे.

बॉलीवूड इंडस्ट्रीला गेल्या काही काळापासून ड्रग्स प्रकरणांमुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आधी सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ड्रग्स प्रकरणात अनेक सेलेब्सची चौकशी करण्यात आली आणि आता बॉलिवूड इंडस्ट्रीशी संबंधित ड्रग्सचे एक नवीन प्रकरण समोर आले आहे. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला एनसीबीने अटक केली आहे. (Bollywood Shahrukh khan son Aryan khan drug case arrested by ncb know about cruise one night price details)
आर्यन खान प्रसिद्धीपासून दूर राहणेच पसंत करतो. त्याला नुकतेच एका क्रूझ पार्टीदरम्यान एनसीबीने ड्रग्ज सेवन केल्याबद्दल अटक केली आहे. त्याला एनसीबीने एक दिवसाच्या कोठडीत ठेवले आहे.
आर्यन खान बॉलिवूड सुपर स्टार शाहरुख खानचा मुलगा आहे. तो आलिशान जीवन जगतो. आर्यन खान ज्या क्रूझमध्ये पार्टी करत, ते काही साधारण क्रूझ नव्हते. त्यात अनेक सुविधा होत्या. या जहाजात पार्टी किंवा रात्र घालविण्याचा खर्चही प्रचंड आहे.
हे क्रूझ वॉटरवेज लेझर टूरिझम प्रायव्हेट लिमिटेडचे आहे. याचे नाव Cordelia Cruises असे आहे. क्रूझमध्ये अनेक सुविधा उपलब्ध आहेत. क्रूझमध्ये पार्टी करण्यासाठी आणि मित्रांसोबत एन्जॉय करण्यासाठीही सर्व प्रकारच्या सुविधा देण्यात आल्या आहेत. म्हणूनच तर, या जहाजावर घेतलेला आनंद लोक बरेच दिवस विसरू शकत नाहीत.
या क्रूझवर आपल्याला फूड पॅव्हेलियन मिळेल. 3 खास रेस्टॉरंट्स मिळतील. 4 बार मिळतील. या क्रूझमध्ये फिटनेस सेंटर, स्पा, सलून, एक कॅसिनो, एक थिएटर, एक अप्रतिम जलतरण तलाव, नाईट क्लब, लाइव्ह बँड आणि डीजे, एक शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि अॅडव्हेंचर अॅक्टिव्हिटीजसह इतरही अनेक गोष्टी आहेत.
क्रूझच्या आत असलेल्या सुविधांसंदर्भात अधिक विस्ताराणे बोलायचे झाल्यास, यातील कॅसिनोदेखील अत्यंत जबरदस्त आहे. असा कॅसिनो तुम्हाला भारतात क्वचितच सापडेल.
या जहाजातील कॅसिनो बारदेखील सुंदर आहे, तुम्ही येथे तुमचे आवडते पेय घेऊ शकता. एवढेच नाही, तर आपण येथे आपल्या आवडत्या संगीताचाही आनंद घेऊ शकता.
आता एवढ्या साऱ्या सुविधा क्रूझवर असतील, तर त्याचे पॅकेजही तेवढेच हाय असेल. कॉर्डेलिया क्रूझच्या टूर पॅकेजची सुवात 17700 पासून होते. हा दर एका रात्रीसाठीचा आहे. कॉर्डेलिया क्रूझचे दोन रात्रींचे मुंबई ते गोवा टूरचे पॅकेज 53100 रुपये एवढे आहे. यात दोन लोक सहभागी होऊ शकतात. त्याचप्रमाणे, दोन रात्रींसाठीचे हाय सी पॅकेज दोन लोकांसाठी 35400 रुपये एवढे आहे.
भारतात कॉर्डेलिया क्रूझची सुरुवात 18 सप्टेंबर 2021 पासून झाली. पुढील वर्षापासून श्रीलंकेसाठीही ही क्रूझ सेवा सुरू होणार आहे. आर्यन खान प्रकरणात एनसीबीची टीम गेस्ट म्हणून या क्रूझ पार्टीत पोहोचली होती.
आर्यन खानबद्दल बोलायचे झाल्यास, रविवारी त्याला एनसीबीने एका दिवसाच्या कोठडीत घेतले. आर्यन खानने पार्टीमध्ये ड्रग्स घेतल्याचे एनसीबीसमोर कबूल केले आहे. एनसीबीने शनिवारी रात्री उशिरा शाहरुख खानच्या मुलाला पकडले होते आणि या प्रकरणात त्याच्याकडे बराचवेळ चौकशीही करण्यात आली.