राम गोपाल वर्मांसोबत अफेअर अन् ९ वर्षांनी लहान व्यावसायिकाशी केलं लग्न, कोण आहे ही बॉलिवूडची अप्सरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2024 17:46 IST2024-02-03T17:28:48+5:302024-02-03T17:46:29+5:30
हिंदी सिनेसृष्टीतील 'रंगीला गर्ल' म्हणून अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला ओळखले जाते.

रंगीला गर्ल
Urmila Matondkar : हिंदी सिनेसृष्टीतील 'रंगीला गर्ल' म्हणून अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला ओळखले जाते. १९७७ मध्ये या अभिनेत्रीने दिग्दर्शक बी आर चोप्रा यांच्या 'कर्म' या सिनेमातून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त अभिनेत्रीने मराठी, मल्याळम आणि तेलगु चित्रपटांमध्ये देखील आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला.
बालकलाकार म्हणून अभिनयय क्षेत्रात पदार्पण
९० च्या दशकात आपल्या अभिनयाने तसेच अदाकारिने चाहत्यांना भूरळ घालणाऱ्या उर्मिलाने असंख्य चित्रपटांमध्ये काम केलं. 'रंगीला', 'एक हसीना थी', 'वो कौन थी', 'सत्या', 'जुदाई' यांसारख्या चित्रपटांमधील तिच्या भूमिका विशेष गाजल्या. १९७४ मध्ये अभिनेत्रीने बालकलाकार म्हणून अभिनयय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर दिग्दर्शक बी आर चोप्रा यांच्या 'कर्म' या चित्रपटात तिनं बिट्टु नावाची भूमिका साकारली होती.
वयाच्या ६ व्या वर्षापासून अभिनयाचे धडे गिरवले
यानंतर तिने 'झाकोळ' या मराठी चित्रपटात देखील अभिनेत्रीने तिच्या अभिनयाची चुणूक दाखवली. त्यावेळी उर्मिला फक्त ६ वर्षांची होती. उर्मिला मातोंडकरनं वयाच्या १७ व्या वर्षी मल्याळम चित्रपटात काम करुन सिनेसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली.
'लकडी की काठी' गाण्यातून लोकप्रिय
उर्मिला 'कलयुग' (१९८०), 'मासूम' (१९८३), 'भावना' १९८४ , 'सूर संगम' (१९८५), 'डकैत' (१९८७) आणि 'बडे घर की बेटी' (१९८९) या चित्रपटांमध्ये दिसली.'मासूम' चित्रपटातील 'लकडी की काठी' हे गाणे आठवत असेल, तर त्यात उर्मिला मातोंडकरने बालकलाकाराची भूमिका निभावली होती.
'रंगीला' सिनेमातून मिळाली ओळख
खरं तर, राम गोपाल वर्मा यांच्या 'रंगीला' सिनेमातून तिला नवी ओळख मिळाली. 'रंगीला' या सिनेमात उर्मिलाने तिच्या भूमिकेचं सोनं केलं. उर्मिला या चित्रपटात आमिर खान आणि जॅकी श्रॉफ यांच्या सोबत ती दिसली होती. या चित्रपटातील तिची भूमिका लक्षवेधी होती. हा त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा होता. जवळपास ३३ कोटी इतकी विक्रमी कमाई करत सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला. रंगीला हिट झाल्यानंतर उर्मिलाच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.या सिनेमासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी फिल्मफेअर नॉमिनेशन मिळालं.
'जुदाई' सिनेमातून चाहत्यांना घातली भूरळ
या चित्रपटाच्या यशानंतर अभिनेत्रीला अनेक चित्रपटांच्या ऑफर येऊ लागल्या. १९९७ मध्ये प्रदर्शित झालेला उर्मिलाचा 'जुदाई' हा सिनेमा देखील सुपर डूपर हिट ठरला. या चित्रपटात तिला अनिल कपूर आणि श्री देवी यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली.
अफेअर्सच्या चर्चांणा उधाण
रंगीलानंतर उर्मिलाचे नाव राम गोपाल वर्मासोबत जोडले जाऊ लागले. रंगीला सिनेमामुळे अभिनेत्री रातोरात स्टार बनली. 'अँथम', 'द्रोही', 'गयाम', 'अंगनागा', 'ओका राजू' आणि हिंदी चित्रपट 'रंगीला', 'रन', 'सत्य', 'कौन', 'मस्त', 'जंगल', 'कंपनी', 'भूत' आणि 'आग' यांसारख्या सिनेमांमध्ये तिनं काम केलंय.
राम गोपाल वर्मांसोबत जोडलं गेलं नाव
राम गोपाल वर्मा यांच्यामुळे तिने दिग्दर्शकांचे चित्रपट नाकारले, कारण राम गोपाल वर्मांचे इंडस्ट्रीतील अनेक लोकांशी जमत नव्हतं. यामुळे काही काळानंतर उर्मिलाला चित्रपटांच्या ऑफर येणे बंद झालं. राम गोपाल वर्मा हे देखील त्या काळात कोणत्याही प्रोजेक्टवर काम करत नव्हते आणि त्यामुळे अभिनेत्रीने त्यांच्यापासून लांब राहणं पसंत केलं.
मॉडेल मोहसिन अख्तर मीरसोबत थाटला संसार
२०१६ मध्ये अभिनेत्रीने बिझनेसमॅन, मॉडल मोहसिन अख्तर मीर यांच्यासोबत लग्न केलं. लक बाय चांस या चित्रपटात त्यांनी काम केलं आहे. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच आणि मोहसीन अख्तर यांच्या वयामध्ये साधारण ९ वर्षांच अंतर असल्याचं सांगितलं जातं.