अभिनेता शवपेटीत अडकून गुदमरला अन्...; बॉलिवूड सिनेमाच्या सेटवर घडलेली भयानक घटना
By देवेंद्र जाधव | Updated: March 23, 2025 15:38 IST2025-03-23T15:20:02+5:302025-03-23T15:38:56+5:30
हा किस्सा एका हॉरर बॉलिवूड सिनेमाच्या सेटवर घडलेला. त्यावेळी सर्वांनाच भीती वाटलेली. काय घडलेलं नेमकं?

हा फोटो पाहून काहींना अंदाज आला असेल की हा किस्सा कोणत्या सिनेमाच्या सेटवर घडलेला. या सिनेमाच्या सेटवर अभिनेता शवपेटीत अडकल्याने सर्वांची घबराट उडाली
'पुराना मंदिर' सिनेमाच्या सेटवर हा भयानक किस्सा घडलेला. हा सिनेमा शूटिंग करताना कलाकारांना सेटवर अनेक विचित्र घटनांना सामोरं जावं लागलं. त्यापैकीच ही एक घटना
'पुराना मंदिर' सिनेमात शैतानाच्या भूमिकेत झळकणारे अभिनेते अनिरुद्ध अग्रवाल शूटिंगदरम्यान शवपेटीत अडकले. काय घडलेलं नेमकं?
दिग्दर्शकाने अॅक्शन म्हटल्यावर अनिरुद्ध यांना शवपेटीतून बाहेर यायचं होतं. परंतु सीन सुरु झाला आणि अनिरुद्ध यांना बाहेर येता येईना. ते शवपेटीत लॉक झाले.
पुढे अनेक तासानंतर अनिरुद्ध यांना बाहेर काढण्यात आलं. ते जेव्हा बाहेर आले तेव्हा त्यांची प्रचंड घुसमट झाली होती. त्यांची अवस्था इतरांना पाहवत नव्हती. सर्वांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं होतं.
या भयानक घटनेनंतर अनिरुद्ध यांनी काही वेळ ब्रेक घेऊन 'पुराना मंदिर' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली. बॉलिवूडमधील प्रमुख हॉरर सिनेमांंमध्ये या सिनेमाचा समावेश जातो.
'पुराना मंदिर' सिनेमात मोहनिश बहल, सदाशिव अमरापुरकर, अनिरुद्ध अग्रवाल, पुनीत इस्सर, आरती गुप्ता हे कलाकार होते. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.