'ही' प्रसिद्ध अभिनेत्री आहे 'सैयारा'च्या दिग्दर्शकाची पत्नी! इमरान हाश्मीसोबत केलंय काम, आता काय करते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 18:40 IST2025-07-23T18:14:57+5:302025-07-23T18:40:27+5:30

'ही' प्रसिद्ध अभिनेत्री आहे 'सैयारा'च्या दिग्दर्शकाची पत्नी! इमरान हाश्मीसोबत केलं काम, बनली सेलिब्रिटी डीजे

मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात करुन उदिताने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. उदिताने पूजा भट्ट दिग्दर्शित ‘पाप’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली.

बॉलिवूडमध्ये असेही कलाकार आहेत जे आपल्या करिअरमधील पहिल्याच चित्रपटातून स्टार झाले. परंतु, कालांतराने हे कलाकार इंडस्ट्रीतून गायब झाले. त्यातील एक नाव म्हणजे उदिता गोस्वामी.

'पाप' या चित्रपटातील 'लागी तुमसे मन की लगन' हे गाणं आजही अनेकांच्या ओठांवर असतं. या चित्रपटातील अभिनेत्री उदिता गोस्वामी काही वर्षांनंतर इंडस्ट्रीपासून दूर गेली. ती सध्या कुठे आहे, याबद्दल जाणून घ्या...

उदिताने तिच्या इमरान हाश्मीसोबत 'जहर' आणि 'अक्सर' हे सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं, ज्यात तिने केलेल्या कामाचं सगळ्यांनी कौतुक केलं. तिच्या बोल्ड सीन्सची सर्वत्र चर्चाही झाली.

त्याचबरोबर ही अभिनेत्री हॉलिवूडमध्ये एन्ट्री घेणार असल्याच्या चर्चा होत्या. याशिवाय १०० सुंदर महिल्यांच्या यादीत तिने स्थान मिळवलं होतं.

जवळपास ९ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर उदिताने आणि मोहित यांनी लग्नगाठ बांधली. या जोडप्याला दोन मुले आहेत.

अभिनयातून ब्रेक घेतल्यानंतर उदिताने डिस्क जॉकी म्हणजेच डिजे म्हणून स्वतःचं नवं करिअर सुरू केलं आहे.