'धूम धाम' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी यामी गौतमचा हटके लूक, सुंदर फोटोशूट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 18:45 IST2025-02-13T18:37:52+5:302025-02-13T18:45:39+5:30

यामी गौतम ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

'विकी डोनर' चित्रपटातून तिने आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. या चित्रपटात तिच्याबरोबर आयुष्मान खुरानाने प्रमुख भूमिका साकारली होती.

सध्याच्या घडीला यामी गौतमचं नाव हिंदी सिनेसृष्टीत आघाडीच्या नायिकांपैकी एक आहे.

लवकरच ती 'धूम धाम'या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हा चित्रपट येत्या १४ फेब्रुवारी २०२५ ला म्हणजेच उद्या 'OTT 'प्लॅटफॉर्म 'Netflix' वर प्रदर्शित करण्यात येईल.

या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेत्रीने केलेल्या हटके लूकची चांगलीच चर्चा रंगली आहे.

याचे फोटो यामीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

कलरफूल लेहेंगा परिधान करुन त्यावर मोकळे केस सोडत अभिनेत्रीने हे फोटो क्लिक केले आहेत.

यामी गौतम या फोटोंमध्ये कमालीची सुंदर दिसते आहे.