नवऱ्याने फसवलं, प्रियकराने ढकललं वेश्याव्यवसायात; श्रीमंत घरात जन्मलेल्या अभिनेत्रीचा झाला 'असा' अंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 17:05 IST2025-10-12T16:20:53+5:302025-10-12T17:05:46+5:30

नवऱ्याने करिअर संपवलं; प्रियकराने ढकललं वेश्याव्यवसायात; हातगाडीवरुन नेण्यात आलेलं अभिनेत्रीचं पार्थिव, काय घडलेलं?

बॉलिवूडमध्ये अनेक असे स्टार्स सापडतील ज्यांनी जीवनातील शेवटचा काळ आर्थिक तंगीत घालवला आहे.

सौंदर्य आणि प्रतिभा असतानाही नशीबात यश नसल्याने, हिंदी चित्रपटसृष्टीत अयशस्वी ठरलेल्या अभिनेत्रींपैकी एक नाव अभिनेत्री विमी. अभिनेत्री विमीची कथाही काहीशी अशीच आहे.

करिअरमधील पहिल्याच चित्रपटातून ही नायिका रातोरात स्टारडम मिळाला. सुनील दत्त यांच्यासोबत हमराज चित्रपटात काम करुन ती प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली. या चित्रपटानंतर तिची गाडी सुसाट पळू लागली.या चित्रपटानंतर विमीने 'आबरु', 'नानक नाम जाहज है', 'पतंगा' आणि 'वचन' सारख्या चित्रपटांत काम केलं.

विमी यांचा जन्म साल १९४३ मध्ये झाला. अगदी लहानपणापासूनच अभिनयाची आवड असल्याने सुरुवातीला नाटकांमध्ये काम केलं. तिचं लग्न कोलकतामधील शिव अग्रवाल या व्यवसायिकासोबत झालं होतं. त्यांना दोन मुलं देखील होती.

अमाप संपत्तीची मालकीण असलेल्या विमी पाली हिलमध्ये राहात होत्या, डिझायनर कपडे घालायच्या. त्याकाळी त्याच्यांकडे स्पोर्ट्स कारही होत्या, असं सांगितलं जातं.मात्र, विमीने जितकी लोकप्रियता मिळवली तितक्याच पटकन ती लोकांच्या नजरेतून गायब सुद्धा झाली.

विमीच्या चित्रपटासंदर्भात पती निर्णय घेऊ लागला.विमीने कोणत्या चित्रपटात काम करायचे आणि कोणत्या नाही हे ठरवायचा. या सगळ्याचा परिणाम तिच्या करिअरवर झाला. तिला काम मिळणं बंद झालं. त्यामुळे पती मारहाण करायचा. शिवाय पैशांसाठी विमीवर छोट्या प्रोड्यूसर्ससोबत काम करण्याचा दबाव तो आणत होता.

पतीसोबत संबंध बिघडले आणि त्याचवेळी ती निर्माता जॉलीच्या प्रेमात पडली.मात्र,जॉलीने तिचं आयुष्य उद्धवस्त केलं.काम मिळवून देण्याच्या नावाखाली जॉलीने तिला वेश्याव्यवसायात ढकळलं.

चित्रपट अपयशी ठरत असल्याने विमी शेवटच्या काळात ती व्यसानाच्या आहारी गेल्या.शिवाय पैशांसाठी ती वेश्याव्यवसाय करायला लागली होती असं म्हटलं जातं. एक अंत्ययात्रेला केवळ चार-पाच जण उपस्थित होते आणि तिची अंत्ययात्रा एका हातगाडीवरून काढण्यात आली होती.