शाहरुखची नायिका, दुप्पट वयाच्या अभिनेत्यासोबत लग्न केलं अन् फसली; ८ वर्षात मोडला संसार; आता काय करते?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 16:07 IST2026-01-19T15:52:26+5:302026-01-19T16:07:20+5:30
यशाच्या शिखरावर असताना ३० वर्षांनी मोठ्या अभिनेत्याच्या पडली, लग्नही केलं पण..; आता जगतेय असं आयुष्य

बॉलिवूड किंग खान अशी ओळख असलेला अभिनेता शाहरुख खानने त्याच्या आजवरच्या कारकिर्दीत अनेक अभिनेत्रींसोबत काम केलं. ९० च्या दशकात त्याच्यासोबत पडद्यावर झळकलेल्या नायिका आजही इंडस्ट्रीत सक्रिय आहेत.

मात्र, त्यातील काही अभिनेत्रींची कारकीर्द केवळ काही चित्रपटांपुरतीच मर्यादित राहिली आणि त्या चित्रपटसृष्टीतून गायब झाल्या. त्यातीलच एक नाव म्हणजे सुचित्रा कृष्णमूर्ती.

'कभी हा, कभीं ना'चित्रपटातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्तीने बॉलिवूडसह दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली.

परंतु, ही अभिनेत्री तिच्या चित्रपट आणि अभिनयापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेच अधिक चर्चेत राहिली आहे. करिअरमध्ये यशाच्या शिखरावर असताना सुचित्राने तिच्यापेक्षा ३० वर्षांनी मोठ्या ज्येष्ठ चित्रपट निर्मात्यासोबत लग्न केलं आणि तिने इंडस्ट्रीला रामराम केला.

चित्रपट निर्माते शेखर कपूर यांच्यासोबत तिने अवघ्या २४ व्या वर्षात संसार थाटला.

सुचित्रा कृष्णमूर्ती एक अभिनेत्री असण्यासोबतच गायिका आणि लेखिका म्हणूनही ओळखली जाते. साल १९९९मध्ये तिने प्रसिद्ध बॉलिवूड निर्माते- दिग्दर्शक शेखर कपूर यांच्याशी लग्न केलं.त्यांच्या वयामध्ये थोडंथोडकं नाहीतर ३० वर्षाचं अंतर होतं. पण,लग्नाच्या आठ वर्षातच ते विभक्त झाले.

या जोडप्याने २००७ मध्ये घटस्फोट घेतला. त्यांना कावेरी कपूर नावाची एक मुलगी देखील आहे. आता अभिनेत्रीने एकटीने मुलीचा सांभाळ करते.

















