सुहाना खान की सारा अली खान फोटोमध्ये पाठमोरी दिसणारी अभिनेत्री नक्की कोण? ओळखा पाहू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2024 16:10 IST2024-04-15T16:02:40+5:302024-04-15T16:10:41+5:30
बॉलिवूडची 'चुलबुली गर्ल' ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे सारा अली खान.

अलिकडेच सारा तिच्या 'ऐ मेरे वतन' या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. चित्रपटांव्यतिरिक्त अभिनेत्री तिच्या फॅशनसेन्समुळे देखील चाहत्यांच लक्ष वेधून घेते.
नुकतंच साराने साडी नेसून केलेल्या एका फोटोशूटला नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळते.
मुंबईतील रस्त्यांवर लेपर्ड प्रिंट साडी परिधान करून अभिनेत्रीने काही फोटोज काढले आहेत.
इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या या फोटोंमध्ये सारा अली खानचा देसी अंदाज पाहायला मिळतोय. मॅचिंग रंगाचा स्ट्रेपी ब्लाऊज तसेच साडीतील तिच्या समर स्पेशल लूकवर अनेकांच्या नजरा खिळल्या आहेत.
''संडे ब्लू फॅन... संडे सन टॅन... रविवार बस स्टॉप... संडे कलर पॉप' 'असं लक्षवेधी कॅप्शन तिने या फोटोंना दिलंय.
सोशल मीडियावर सारा अली खानच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून हे फोटो शेअर करण्यात आले आहेत. साराचा असा ब्लॅक अॅन्ड व्हाईट अंदाज अनेकांना भावलाय.
सध्या सारा तिच्या आगामी प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. सारा 'मेट्रो इन दिनो' या चित्रपटांत झळकणार आहे. यामध्ये ती आदित्य रॉय कपूरसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.