कतरिना अन् प्रियंकाच्या स्टारडमला टक्कर देणारी नायिका! यशाच्या शिखरावर असताना इंडस्ट्री सोडली, आता ओळखूच शकणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 17:29 IST2026-01-15T17:16:49+5:302026-01-15T17:29:36+5:30
एकेकाळी बॉलिवूड गाजवलं, अक्षय खन्नासोबत जमलेली अभिनेत्रीची जोडी, प्रसिद्धीकडे पाठ फिरवून सोडली मुंबई, आता काय करते

बॉलिवूड इंडस्ट्रीत अशा अनेक अभिनेत्री सापडतील ज्यांना करिअरच्या पहिल्याच चित्रपटातून रातोरात स्टार झाल्या. मात्र, सगळं काही सुरळित सुरु असताना या झगमगत्या दूनियेतून त्या अचानक गायब झाल्या.

यापैकीच एक नाव म्हणजे रिमी सेन. रिमी सेनने २००३ साली 'हंगामा' या सुपरहिट चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. करिअरमधील पहिलाच चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. या चित्रपटातील तिचा साधेपणा व अभिनय प्रेक्षकांना प्रचंड भावला.

त्यानंतर रिमीने मागे वळून पाहिलं नाही. 'बागबान', 'क्योंकी', 'फिर हेरा फेरी' तसेच 'गोलमाल-फन अनलिमिटेड', ‘जॉनी गद्दार’ अशा गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे.

त्याच काळात प्रियांका चोप्रा,कतरिना कैफ आणि इतर अनेक नवीन अभिनेत्रीही या क्षेत्रात एन्ट्री केली होती. २००० च्या दशकात बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी ती एक होती. त्याकाळी रीमी भल्याभल्या नायिकांना टक्कर देत होती.

यानंतर काही वर्षात रिमीने इंडस्ट्री सोडली. चांगल्या भूमिका मिळत नसल्याने ती दूर गेली असं तिने कारण दिलं.२०११ मध्ये ती शेवटची सिनेमात दिसली.

एकेकाळी बॉलिवूड गाजवणारी ही अभिनेत्री आता फारच सुंदर दिसते. रिमीचा लूक आता पूर्णपणे बदलला असून चाहते तिला ओळखूच शकत नाही.

बॉलिवूड सोडल्यानंतर रिमी दुबईमध्ये स्थायिक झाली आहे. आता ती पडद्यामागे निर्माती म्हणून काम करते. सध्या रिमी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.
















