बॉलिवूडची सगळ्यात देखणी अभिनेत्री! आशा पारेख यांच्याशी व्हायची तुलना, ११ वर्षांनी मोठ्या हिरोच्या प्रेमात पडली अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 16:51 IST2026-01-07T16:39:18+5:302026-01-07T16:51:40+5:30
बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री, ज्याला जीव लावला त्याने फसवलं; पाकिस्तानी क्रिकेटरसोबत लग्न केलं अन् करिअर संपलं

हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या साधेपणाने आणि भारतीय सौंदर्याने प्रेक्षकांना मोहवणारी, बॉलिवूडच्या एकेकाळच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रीना रॉय.

रीना रॉय यांचा जन्म ७ जानेवारी १९५७ मुंबई येथे झाला. रीना रॉय यांचे खरे नाव रुपा सिंह. रीना यांचे वडील मुस्लिम तर आई हिंदू होती.

दुर्दैवाने रीना रॉय यांच्या आईवडिलांचा संसार फार काळ टिकू शकला नाही.आई आणि बहिण-भावांच्या उदरनिर्वाहासाठी रीना यांनी वयाच्या१३ व्या वर्षी आपल्या चेहऱ्यावर मेकअप चढवला.

करिअरच्या सुरुवातीला त्यांनी निर्मात्यांच्या स्टुडीओचे उंबरठे झिझवून स्क्रीन टेस्ट देण्याचा सपाटा लावला. मात्र, त्यांचे सौदर्य बी.आर.इशारांनी बरोबर हेरले. ‘नई दुनिया नए लोग’ हा त्यांचा पहिला हिंदी सिनेमा ठरला. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला.

रीना यांच्या सुरुवातीच्या काळात समीक्षक त्यांची तुलना आशा पारेख यांच्याशी करायचे, रीना यांना ते पटत नव्हतं. १९७६ साली प्रदर्शित झालेल्या राजकुमार कोहली यांच्या ‘नागिन’ या सिनेमामुळे रीना या रातोरात प्रसिद्ध झाल्या.

या सिनेमातील अभिनयासाठी रीना यांना फिल्मफेअरचे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे नामांकन मिळाले होते. नागीण नंतर त्या ‘जानी दुश्मन’, ‘मुकाबला’, ‘बदले की आग’ आणि ‘राजतिलक’,‘अपनापन’ अशा चित्रपटांचा भाग झाल्या.

बॉलिवूडमध्ये यशस्वी घौडदौड सुरु असताना रीना रॉय आणि अभिनेता शत्रुघ्न सिन्हा अफेअर यांच्या अफेअरची बरीच चर्चा रंगली होती. दोघांची करिअरची सुरुवात एकाच काळात झाली होती. दोघेही एकमेकांना डेट करत होते.मात्र, या नात्याला दुर्दैवाने काही नाव मिळालं नाही.

एकेकाळी इंग्लंड दौऱ्याच्या वेळी पाकिस्तानी क्रिकेटर मोहसिन खानशी तिच्या ओळख झाली. मात्र, यावेळी कोणताही विचार न करता रीना यांनी त्याच्याशी १९८३ मध्ये निकाह लावला. खरे तर ह्या निर्णयामुळे तिचे करिअर उद्ध्वस्त झाले. त्यांच्यामध्ये खटके उडू लागले.मग पाकिस्तानात जाऊन रीना यांनी त्यांच्याशी तलाक घेतला.

पण, एकुलत्या एक लाडक्या मुलीची ‘सनम’ची कस्टडी मिळाली नाही.मग रीना आईकडे परतल्या आणि पुन्हा बॉलीवूडमध्ये रिएन्ट्री घेतली. त्यानंतर त्या ‘गैर’ आणि ‘रीफ्युजी’ या सिनेमांमध्ये झळकल्या.

















