आवाजावरून खिल्ली उडवली, रंगावरून हिणवलं गेलं; स्वत:ला सिद्ध करून तिने केली सगळ्यांची बोलती बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 18:10 IST2026-03-21T17:24:02+5:302026-03-21T18:10:48+5:30
स्वत: च्या आवाजामुळे टेन्शमध्ये असायची अभिनेत्री, 'तो' आवाज बनला ओळख, नॅशनल अवॉर्डवर कोरलं नाव,कोण आहे ती?

Rani Mukerjii: हिंदी फिल्म इंडस्ट्रीवर एकेकाळी अधिराज्य गाजवलेली व आजही अनेक तरुणांना आपल्या सौंदर्याने मोहून टाकणारी अशी अभिनेत्री म्हणजे राणी मुखर्जी. आज २१ मार्च, १९७८ रोजी या अभिनेत्रीचा जन्मदिवस.

राणीचे वडील राम मुखर्जी हे फिल्मालय स्टुडिओ चे माजी चित्रपट दिग्दर्शक व संस्थापक होते. राणीच्या आईच नाव, कृष्णा मुखर्जी, त्या पार्श्वगायिका होत्या. घरी कलेचा वारसा असताना देखील चित्रपटसृष्टीत येण्यास खास रस नव्हता, तिला काहीतरी वेगळेच करायचं होतं.

आजवर अनेक कलाकृतींमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या या अभिनेत्रीची एकेकाळी तिच्या रंगरुपावरुन आणि आवाजावरून खिल्ली उडवली गेली होती.

एका मुलाखतीत राणीने तिला आलेल्या या कटू अनुभवांवर भाष्य केलं होतं. चित्रपटसृष्टीतला तिचा हा प्रवास फार काही सोपा नव्हता.

"मी माझ्या चाहत्यांचे मनापासून आभार मानते. एक कलाकार जसा असतो तसंच त्याला त्या रुपात स्वीकारणं हा चाहत्यांचा निर्णय असतो. इंडस्ट्रीत सुरुवातीच्या काळात माझा आवाज डब केला जायचा. परंतु, प्रेक्षकांना माझा खरा आवाज आवडू लागला. आणि, त्यांच्या याच ताकदीमुळे टिकाकारांची तोंड आपोआप बंद झाली", असं राणी म्हणाली होती.

राणी मुखर्जीचा पहिला चित्रपट वयाच्या १८ व्या वर्षी केला. “बियेर फूल” हा बंगाली चित्रपट होता व त्याचे निर्माते हे राणीचे वडीलच होते. त्यानंतर सलीम खान ने तिला दुसरा प्रस्ताव मांडला “राजा कि आयेगी बारात” या चित्रपटासाठी. तो तिने “प्रयोगतत्वावर चित्रपट सृष्टी ‘ट्राय'” करून बघ या आईच्या सल्ल्यामुळे मान्य केला.

चित्रपटात काम करायची सुरवात करण्याआधी तिने रोशन तनेजा ऍक्टिंग इन्स्टिटयूटमध्ये अभिनयाचे धडे घेतले. त्यानंतर तिच्या करियरची गाडी सुसाट सुटली. करण जोहरच्या कुछ कुछ होता है ह्या चित्रपटामध्ये शाहरूख खान व काजोलसोबत राणीला आघाडीची भूमिका साकारुन राणी लाखो चाहत्यांती आवडती झाली.

यानंतर तिने ‘कभी खुशी कभी गम’, ‘मुझसे दोस्ती करोगे’, ‘साथिया’ .’बंटी आणि बबली’ यासारख्या हिट चित्रपटात मुख्य भूमिका साकारली. राणीने अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिका केल्या व तिला आजवर ७ फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. राणीच्या खाजगी आयुष्याबद्दल लवकर कॅमेऱ्यासमोर न बोलणार्या राणीने चित्रपट दिग्दर्शक आदित्य चोप्रा सोबत विवाह केला व तिला एक मुलगी सुद्धा आहे.

















