'तेरी जुल्फों की लहराती अंगडाईयाँ..' रकुल प्रीत सिंगचा इंडो-वेस्टर्न लूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 16:03 IST2024-05-03T15:56:33+5:302024-05-03T16:03:36+5:30
दक्षिणात्य सिनेसृष्टीपासून बॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयााचा डंका वाजवणारी अभिनेत्री म्हणजे रकुल प्रीत सिंग.

२०१४ मध्ये आलेल्या 'यारियॉं' या चित्रपटाच्या माध्यमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
नुकतीच अभिनेत्री विवाहबंधनात अडकली आहे. अभिनेता जॅकी भगनानीसोबत तिने लग्नगाठ बांधली.
दमदार अभिनय तसेच आपल्या सौंदर्याच्या जोरावर तिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.
नुकतेच रकुलने सोशल मीडियावर तिचे काही निवडक फोटो पोस्ट केले आहेत.
रकुलचे हे इंडो-वेस्टर्न लूकमधील फोटोज सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
तपकिरी रंगाचा ड्रेस त्यावर पिवळ्या रंगाचं जॅकेट परिधान करत तिने चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे.
या ड्रेसवर रकुलने घातलेल्या ऑक्साईड दागिन्यांनी तिच्या सौंदर्यात भर घातली आहे.