गोविंदाच्या सिनेमातून केला डेब्यू, रातोरात झाली स्टार! 'त्या' घटनेनंतर अभिनेत्रीने इंडस्ट्रीच सोडली, काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 11:49 IST2026-02-11T11:40:04+5:302026-02-11T11:49:26+5:30
प्रसिद्धीच्या शिखरावर असताना नको ते घडलं; २५ व्या वर्षी 'या' अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री, आता जगतेय असं आयुष्य

चित्रपटसृष्टी खूप मोठे जग आहे. दूरचित्रवाणी आणि बॉलीवूड जगतातील अनेक तारे येतात आणि त्यांची प्रतिभा दाखवतात. काहीं यशस्वी होतात तर काही अपयशी. काहींना करिअरच्या पहिल्याच सिनेमातून स्टारडम मिळतं तर काही जण वर्षानुवर्ष मेहनत करूनही त्यांना यश मिळत नाही.

अशीच एक अभिनेत्री जिने करिअरच्या सुरुवातीलाच इंडस्ट्रीतील मातब्बर कलाकारांसोबत काम केलं. मा मात्र, कालांतराने ही अभिनेत्री इंडस्ट्रीतून गायब झाली. या अभिनेत्रीचं नाव राजेश्वरी लांबा आहे.

९० च्या दशकातील ही अभिनेत्री फक्त चित्रपट करूनच थांबली नाहीतर तिने लोकप्रिय टीव्ही शोज आणि म्युझिक अल्बमध्येही काम केलं. कमी वयातच तिने मॉडलिंग सुरू केली होती. वयाच्या २२ व्या वर्षी रागेश्वरीने पहिला अल्बम 'दुल्हनिया' काढला होता. ज्यात तिने अभिनयही केला होता. त्यानंतर ती रातोरात स्टार झाली.

रागेश्वरीने 'ऑंखे' या सिनेमातून चंदेरी दुनियेत पाऊल ठेवलं. पहिल्याच चित्रपटातून रागेश्वरी चांगलीच प्रसिद्धीझोतात आली. त्यानंतर तिने 'मैं खिलाड़ी तु अनाड़ी'मध्ये अभिनय केला. या चित्रपटात ती सैफ अली खानची हिरोईन होती.

रागेश्वरीने 'ऑंखे'या सिनेमातून चंदेरी दुनियेत पाऊल ठेवलं. पहिल्याच चित्रपटातून रागेश्वरी चांगलीच प्रसिद्धीझोतात आली. त्यानंतर तिने 'मैं खिलाड़ी तु अनाड़ी'मध्ये अभिनय केला. या चित्रपटात ती सैफ अली खानची हिरोईन होती.

परंतु, यशाच्या शिखरावर असताना अभिनेत्रीला नशीबाने साथ दिली नाही. 'Y2K - साल दो हज़ार' या म्युझिक व्हिडीओ करताना तिची तब्ब्येत बिघडली. त्यादरम्यान तिला मलेरिया झाला आणि आठवड्याभरात तिला बेल्स पाल्सी असल्याचं निदान झाले.

त्यामुळे अभिनेत्रीच्या चेहऱ्याला पॅरालिसीस गेला होता. त्यानंतर तिचं विश्वच बदललं.या आजाराने तिला चार वर्षे अंथरुणाला खिळून ठेवले. तरीही, ती खचली नाही. या काळात तिने फिजिओथेरपी आणि योगाचा मार्ग निवडला. त्यामुळे रागेश्वरीने अवघ्या २५ वर्षी चित्रपटसृष्टीला रामराम केला.

२०१२ मध्ये, ती लंडनला गेली, जिथे तिची भेट तिचे सुधांशू स्वरूप यांच्याशी झाली.त्यादरम्यान, त्यांच्यात मैत्री आणि या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. रागेश्वरी आणि सुधांशू यांनी २०१४ मध्ये लग्न केलं. आता ती लंडनमध्ये वास्तव्यास आहे. मात्र, आपल्या भारतीय संस्कृतीशी तिची नाळ टिकून आहे.

















