खणाची नऊवारी साडी अन् मराठमोळा साज; 'मैंने प्यार किया'मधील सुमनचा पारंपरिक लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2024 16:43 IST2024-07-20T16:32:04+5:302024-07-20T16:43:22+5:30

'मैंने प्यार किया' या चित्रपटामुळे अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धनच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली.

जवळपास ३५ वर्षांपूर्वी 'मैंने प्यार किया' हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटामुळे अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धनच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली.

मराठी कुटुंबातील ही मुलगी तिच्या पहिल्याच चित्रपटातून प्रसिद्धीझोतात आली. भाग्यश्रीला ‘मैंने प्यार किया’ या सिनेमाने नवी ओळख दिली.

अभिनेत्रीने आपल्या करिअरची सुरूवात ‘कच्ची धूप’ या मालिकेतून केली होती. त्यानंतर तिने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. पण अचानक भाग्यश्रीने लग्नाचा निर्णय घेतला आणि तिच्या करिअरला ब्रेक लागला.

आजही चाहत्यांमध्ये भाग्यश्रीची क्रेझ कमी झाली नसून ती सोशल मीडियाच्या माध्यमातून कायम चाहत्यांच्या संपर्कात येत असते.

भाग्यश्रीने अलिकडेच सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.

खणाची साडी त्यावर साजेसे दागिने तसेच नाकात नथ असा पारंपरिक साज तिने केला आहे.

भाग्यश्रीचा हा मराठमोळा अंदाज नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे.