'खल्लास गर्ल' इशा कोप्पीकरच्या नवऱ्याविषयी माहित आहे का? महिन्याला करतात कोट्यवधींचा बिझनेस

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 03:00 PM2021-12-29T15:00:00+5:302021-12-29T15:00:01+5:30

Isha kopiker: अभिनेत्री प्रिती झिंटामुळे टिम्मी आणि इशा यांची भेट झाली होती. त्यानंतर या भेटीचं मैत्रीत आणि पुढे प्रेमात रुपांतर झालं.

'डॉन', 'सलाम-ए-इश्क', 'क्या कूल हैं हम', 'Krishna Cottage' अशा अनेक चित्रपटांमध्ये झळकलेली अभिनेत्री म्हणजे इशा कोप्पीकर (Isha Koppikar).

बॉलिवूडची 'खल्लास गर्ल' या नावाने आज इशा ओळखली जाते. परंतु, तिचा कलाविश्वातील वावर मात्र कमी झाला आहे.

१९ सप्टेंबर १९७६ मध्ये मुंबईतील एका कोकणी कुटुंबात इशाचा जन्म झाला. अभिनयाची आवड असणाऱ्या इशाने मॉडलिंगपासून तिच्या करिअरची सुरुवात केली.

'प्यार इश्क और मोहब्बत' या चित्रपटात झळकलेल्या इशाला 'कंपनी' या चित्रपटामुळे खरी ओळख मिळाली. या चित्रपटानंतर ती रातोरात सुपरस्टार झाली.

इशाने डॉन, सलाम-ए-इश्क, क्या कूल हैं हम, हम तुम, कंपनी, पिंजर, कृष्णा कॉटेल या चित्रपटांमध्ये काम केलं. परंतु, अनेक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या या अभिनेत्रीने अचानकपणे कलाविश्वातून काढता पाय घेतला.

जवळपास १० वर्ष कलाविश्वात काम केल्यानंतर सिनेसृष्टीला रामराम करणारी ही अभिनेत्री आज कोट्यवधींची मालकीन असल्याचं पाहायला मिळतं.

इशाने २९ नोव्हेंबर २००९ मध्ये प्रसिद्ध उद्योगपती टिम्मी नारंग यांच्यासोबत लग्न केलं. टिम्मी नारंग हे हॉटेल व्यावसायिक असून त्यांचा मोठा बिझनेस आहे.

इशा आणि टिम्मी यांनी मुंबईतील जुहू येथे इस्कॉन मंदिरात महाराष्ट्रीयन पद्धतीने लग्न केलं.

अभिनेत्री प्रिती झिंटामुळे टिम्मी आणि इशा यांची भेट झाली होती. त्यानंतर या भेटीचं मैत्रीत आणि पुढे प्रेमात रुपांतर झालं.

इशा आणि टिम्मी यांना एक लहान मुलगी असून रियाना असं तिचं नाव आहे.