राज्यस्तरीय बॅडमिंटनपटू होती 'ही' बॉलिवूड अभिनेत्री! सौंदर्य अन् अभिनयाचे जगभर चाहते, पतीही आहे स्टार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 17:51 IST2026-01-05T17:40:53+5:302026-01-05T17:51:30+5:30
राज्यस्तरीय बॅडमिंटनपटू होती 'ही' बॉलिवूड अभिनेत्री! सौंदर्य अन् अभिनयाचे जगभर चाहते, कोण आहे ती?

लखलखत्या हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या साधेपणाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांना मोहवणारी व बॉलिवूडची 'मस्तानी' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे दीपिका पादुकोण

हिंदी सिनेसृ्ष्टीतील आघाडीच्या नायिकांमध्ये दीपिकाचं नाव अव्वल स्थानावर येतं.दीपिकाचा जन्म 5 जानेवारी 1986 रोजी डेन्मार्कची राजधानी कोपेनहेगन येथे झाला.

भारतातील दिग्गज बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण यांची ती लेक आहे. दीपिका देखील उत्तम बॅडमिंटनपटू आहे मात्र, तिने शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभिनयाकडे आपला मोर्चा वळवला.दीपिकाही राष्ट्रीय स्तरावर बॅडमिंटन खेळली आहे.

दीपिका १ वर्षांची असताना तिचे कुटुंब डेन्मार्कमधून भारतात स्थलांतरित झाले.

दीपिकाने तिच्या फिल्मी करिअरला हिंदी चित्रपटातून नाही तर कन्नडमधून कामाला सुरुवात केली. २००६ मध्ये कन्नड चित्रपट ऐश्वर्या मधून केली होती. या चित्रपटातून तिला पहिली ओळख मिळाली.

दीपिका पदुकोणची कारकीर्द यशस्वी राहिली आहे. ओम शांती ओम नंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. पद्मावत, पठाण, जवान तसंच कॉकटेल, ये जवानी है दिवानी यांसारखे सुपरहिट सिनेमे तिच्या नावावर आहेत. सध्याच्या घडीला दीपिका बॉलिवूडमधील आघाडींच्या नायिकांमध्ये गणली जाते.

वैयक्तिक आयु्ष्यात तिने अभिनेता रणवीर सिंगसोबत लग्नगाठ बांधली. २०१८ मध्ये त्यांचं लग्न झालं. या दोघांना नुकतीच एक मुलगी झाली आहे.

















