१७ व्या वर्षी प्रेम,लग्न केलं पण फसली! दोन वर्षांत अभिनेत्रीचं बिनसलं; करिअरसाठी लपवलेलं 'ते' सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 16:26 IST2025-10-29T15:16:30+5:302025-10-29T16:26:48+5:30

लग्न केलं पण फसली!दोन वर्षांत अभिनेत्रीचं बिनसलं; शाही घराण्याशी आहे कनेक्शन

हिंदी चित्रपटांतील आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे आदिती राव हैदरी.

बॉलिवूडमधल्या सुंदर अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या नायिकेने आपल्या अभिनयाने चित्रपटसृष्टीत स्वतःचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.

हैदराबाद निजामाशी संबंधित असलेल्या तैयबजी-हैदरी राजघराण्यात २८ ऑक्टोबर १९८६ ला आदितीचा जन्म झाला. तिची आई शास्त्रीय संगीत गायिका होती.

'रॉकस्टार', 'मर्डर ३ ',' कात्रू वेलियिदाई', 'सम्मोहनम ',' पद्मावत', 'ज्युबिली ' आणि' हीरामंडी' या चित्रपटांमध्ये काम करत आदिवतीने सिनेरसिकांच्या मनावर गारुड घातलं.

२००७ मध्ये शारदा रामनाथन यांच्या 'शृंगारम" या तामिळ चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले, या चित्रपटात तिने १९ व्या शतकातील देवदासीची मुख्य भूमिका साकारली होती.

वयाच्या १७ वर्षी अदिती वकील सत्यदीप मिश्राच्या प्रेमात पडली होती.त्यानंतर २१ व्या वर्षी तिने लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही.

त्यांच्यामध्ये सातत्याने वाद होत असल्याने या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. सत्यदीप मिश्रा आता नीना गुप्ता यांचा जावई आहे.

दरम्यान,'दिल्ली ६'या हिंदी चित्रपटातून अदिती राव हैदरी हिने हिंदी चित्रपटसृष्टीत एन्ट्री घेतली. शिवाय तिने आपल्या मेहनतीच्या जोरावर नावही कमावलं.असंही म्हटलं जातं कीन बॉलिवूडमधील करिअरसाठी लग्न आणि घटस्फोट या सर्व गोष्टी लपवल्या होत्या.

गतवर्षी १६ सप्टेंबर २०२४ मध्ये दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेता सिध्दार्थसोबत वनपर्थी येथील श्री रंगनायक स्वामी मंदिरात आदितीने लग्न केलं.