२८ दिवसांत १८ किलो वजन केलं कमी, बॉलिवूड अभिनेत्याने सांगितलं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशनचं रहस्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 16:39 IST2025-04-14T15:40:56+5:302025-04-14T16:39:40+5:30
बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्याने २८ दिवसांमध्ये १८ किलो वजन कसं कमी केलं, यामागचं सीक्रेट सांगितलं आहे

एका बॉलिवूड अभिनेत्याने २८ दिवसांमध्ये तब्बल १८ किलो वजन कमी केलं. एका भूमिकेसाठी कलाकार स्वतःला किती झोकून देऊ शकतो, हे यातून बघायला मिळतं.
हा अभिनेता म्हणजे रणदीप हुड्डा. रणदीपने शुभांकर मिश्राच्या पॉडकास्टमध्ये याविषयी खुलासा केला.
रणदीप हुड्डाने 'सरबजीत' सिनेमासाठी २८ दिवसांमध्ये १८ किलो वजन कमी केलं होतं. यासाठी रणदीपने किती मेहनत घेतली याचा खुलासा त्याने केलाय.
सरबजीत यांना १८ वर्ष जेलमध्ये डांबून ठेवण्यात आलं होतं. सुकलेली भाकरी खाऊन त्यांनी दिवस काढले होते. त्यामुळे रणदीपने या भूमिकेसाठी वजन कमी करायला सुरुवात केली.
"हिंदू धर्मात अनेक व्रत आहेत. या दिवशी उपवास केल्याने आपल्या शरीराला आराम मिळतो. खाऊन आपल्याला कायम सुस्तपणा येतो", असं रणदीपचं म्हणणं आहे
वजन कमी करण्यासाठी रणदीपने २८ दिवसांमध्ये फक्त मुबलक पाणी, ग्रीन टी आणि ब्लॅक टीचं सेवन केलं. प्रचंड मेहनत आणि त्रास होऊनही रणदीपने स्वतःचं वजन कमी केलं.
रणदीपची भूमिका असलेला 'जाट' सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. या सिनेमात रणदीपने खलनायकी भूमिका साकारली आहे.