अर्ध्यावरती डाव मोडला! कोण आहे अनुपम खेर यांची पहिली पत्नी? दोन घटस्फोटानंतर आता जगतेय 'असं' आयुष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 17:38 IST2025-07-17T17:03:34+5:302025-07-17T17:38:14+5:30
प्रेम, लग्न अन् घटस्फोट; लग्नाच्या काही वर्षांतच संसार मोडला; आता काय करते अनुपम खेर यांची पहिली पत्नी?

बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर हे हिंदी सिनेसृष्टीतील नावाजलेलं नाव आहे. आपल्या आजवरच्या कारकिर्दीत त्याने एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे दिले आहेत.
परंतु, अनुपम खेर हे त्यांच्या चित्रपटांमुळेच नाही तर त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिले.
अनुपम खेर आणि किरण यांनी १९८५ मध्ये लग्न केलं. जवळपास एक दशकांहून अधिक काळ ते एकमेकांचे चांगले मित्र होते. परंतु, फार कमी लोकांना त्यांची पहिली पत्नी कोण होती? याबद्दल माहिती आहे.
किरण खेर यांच्या आधी अनुपम खेर यांचे पहिले लग्न अभिनेत्री मधुमालती कपूरशी झाले होते. साल १९७१ मध्ये त्यांनी मधुमालती कपूर यांच्यासोबत लग्नगाठ बांधली.
मात्र, त्याचं नातं हे फार काळ टिकू शकलं नाही. अनुपम खेर आणि मधुमालती कपूर यांची ओळख कॉलेजमध्ये झाली. कॉलेजच्या काळात ते जवळचे मित्र बनले. त्यावेळी दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते.
काही वर्षांनी दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. असं म्हटलं जातं की त्यावेळी अनुपम खेर लग्नासाठी तयार नव्हते, परंतु कुटुंबाच्या दबावामुळे त्यांनी लग्न केलं होतं.
मधुमालती कपूर हे हिंदी आणि पंजाबी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्याने अनेक गाजलेल्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांनी 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा', 'सोनू की टीटू की स्वीटी' आणि 'गदर: एक प्रेम कथा'मध्येही काम केले.
अनुपम खेर यांच्यापासून वेगळे झाल्यानंतर मधुमालती यांनी लेखक-दिग्दर्शक रणजित कपूर यांच्याशी लग्न केलं. मात्र,त्याचं हे लग्नही फार काळ टिकलं नाही. त्यानंतर दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. यानंतर मधुमालती यांनी लग्न केलं नाही. आता त्या एकट्याच राहतात.