Shahid Kapoor : लय भारी! अप्रतिम इंटिरियरने सजलंय शाहिद कपूरचं 58 कोटींचं आलिशान घर; पाहा Inside फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2023 07:08 PM2023-06-09T19:08:54+5:302023-06-09T19:23:06+5:30

Shahid Kapoor And Mira Rajput : अभिनेत्याच्या 58 कोटींच्या आलिशान घराचे Inside फोटो पाहुया...

अभिनेता शाहिद कपूर सध्या त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'ब्लडी डॅडी' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. शाहीद मुंबईतील वरळी येथील एका आलिशान अपार्टमेंटमध्ये त्याची सुंदर पत्नी मीरा आणि दोन गोंडस मुलांसोबत राहतो. अभिनेत्याच्या 58 कोटींच्या आलिशान घराचे Inside फोटो पाहुया...

शाहिद आणि मीरा अनेकदा त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर त्यांच्या नवीन घराचे फोटो शेअर करत असतात. जे घऱ हुबेहुब एखाद्या महालासारखं दिसतं. अप्रतिम इंटिरियरने सजलेलं हे घर पाहताच कोणीही या घराच्या प्रेमात पडेल.

शाहिद-मीराचे हे स्वप्नातील घर एक डुप्लेक्स अपार्टमेंट आहे. जे महागडं इंटिरियर आणि आधुनिक फर्निचरसह तयार करण्यात आलं आहे. 8,625 स्क्वेअर फूटचं हे घर आहे. ज्यांच्या बाल्कनीतून सी लिंकचे सुंदर दृश्य दिसतं.

शाहिद कपूरच्या या घराची किंमत तब्बल 58 कोटी आहे हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. ज्यात एक नाही तर अनेक मोठ्या बाल्कनी आहेत. कपलचं हे घर अत्यंत सुंदर असून त्यातील प्रत्येक गोष्ट लक्ष वेधून घेते.

शाहिदच्या घराचा हा लिव्हिंग एरिया देखील आहे. जे बऱ्यापैकी प्रशस्त आहे. सुंदर लायटिंगच्या फीचर्सने हे डेकोरेट केलेलं आहे आणि भिंती महागड्या पेंटिंगने सुशोभित करण्यात आल्या आहेत.

शाहिद कपूर व मीरा राजपूत हे बॉलिवूडचं लोकप्रिय कपल. शाहिद व मीरा किती लक्झरी आयुष्य जगतात, हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. नवरात्रीचा शुभ मुहूर्त साधत शाहिद व मीरा यांनी नव्या घरात गृहप्रवेश केला होता. छोटीशी गृहप्रवेशाची पूजा देखील केली होती.

शाहिदची पत्नी मीरा राजपूतला पियानो वाजवण्याची खूप आवड आहे. म्हणूनच त्याने पियानोसाठी देखील घरात एक खास जागा ठेवली आहे. जिथे ती अनेकदा तिचा वेळ आनंदात घालवते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

2018मध्ये शाहिद-मीराने वरळी परिसरात हे घर खरेदी केलं होतं. वांद्रे-वरळी सी लिंकजवळ 360 वेस्टमध्ये एका बहुमजली इमारतीच्या 42 व्या 43 व्या फ्लोअरवर हे ड्युप्लेक्स अपार्टमेंट आहे.

मीशा व झैनच्या जन्मानंतर राहतं घर छोटं वाटू लागलं. त्यामुळे मीरा व शाहिदने नवं घर खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता आणि काहीच दिवसांत त्यांना त्यांच्या स्वप्नांतलं घर मिळालं होतं.