PHOTOS : शहनाजचा साऊथ इंडियन लुक, सामंथापेक्षाही सुंदर दिसतेय ब्युटी क्वीन!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2022 16:56 IST2022-10-10T16:52:56+5:302022-10-10T16:56:55+5:30
Shehnaaz Gill : कांजीवरम साडीत शहनाज कमालीची सुंदर दिसतेय. साडीतील तिचा हा लुक पाहून चाहते फिदा झालेत...

‘बिग बॉस 13’मधून घराघरात पोहोचलेली शहनाज गिल हिचे लाखो फॅन्स आहेत. सध्या तिच्या फोटोशूटची चर्चा आहे.
बेंगळुरमध्ये फिल्मफेअर साऊथ अवार्डचं आयोजन केलं होतं. शहनाजही या इव्हेंटमध्ये सामील झाली. या लुकचे फोटो तिने शेअर केले आहेत.
कांजीवरम साडीत शहनाज कमालीची सुंदर दिसतेय. साडीतील तिचा हा लुक पाहून चाहते तिच्यावर फिदा झालेत.
शहनाजचे हे फोटो सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत. चाहते तिच्या क्यूटनेसचे ‘दिवाने’ झाले आहेत.
काही तासांत 6 लाखांवर लोकांनी या फोटोंना लाइक्स केलं आहे. लवकरच शहनाजचा बॉलिवूड डेब्यू होतोय.
आत्तापर्यंत शहनाज पंजाबी फिल्म इंडस्ट्रीत सक्रीय होती. पण आता बॉलिवूड सिनेमात ती दिसणार आहे.
सलमान खानच्या ‘कभी ईद कभी दीवाली’ या सिनेमात तिची वर्णी लागली आहे.