'मिशन रानीगंज'साठी अक्षय कुमारने घेतलं १०० कोटींपेक्षा जास्त मानधन; आकडा ऐकून येईल चक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2023 02:43 PM2023-10-05T14:43:51+5:302023-10-05T14:48:39+5:30

Mssion raniganj: अक्षय कुमारने पार केली मानधनाची मर्यादा; जाणून घ्या, अन्य कलाकारांचं मानधन

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि परिणीती चोप्रा सध्या त्यांच्या मिशन रानीगंज या सिनेमामुळे चर्चेत येत आहेत.

६ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाची सध्या सगळीकडे चर्चा रंगली असून या सिनेमासाठी कलाकारांनी नेमकं किती मानधन घेतलं त्याचा आकडा समोर आला आहे.

दिव्येंदु भट्टाचार्य- दिव्येंदू भट्टाचार्य यांचा सध्या ओटीटीवरचा वावर वाढला आहे. अनेक वेबसीरिज, सिनेमांमध्ये त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली आहे. मिशन रानीगंजमध्ये त्याने महत्त्वाची भूमिका साकारली असून यासाठी २० कोटी रुपये मानधन घेतलं आहे.

वरुण बडोला छोट्या पडद्यावरील लोकप्रिय नाव म्हणजे वरुण बडोला. आजवरच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. या सिनेमासाठी त्यांनी १० लाख रुपये मानधन घेतलं आहे.

परिणीती चोप्रा- नुकतीच लग्नाच्या बेडीत अडकलेल्या परिणीतीने या सिनेमात जसवंत सिंह गिल यांची पत्नी निर्दोष कौर ही भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी तिने ३ कोटी रुपये मानधन घेतलं आहे.

रवि किशन - मिशन रानीगंज या सिनेमात भोजपुरी सुपरस्टार रवि किशन एका महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार असून या सिनेमासाठी त्यांनी ५५ लाख रुपये मानधन घेतलं आहे.

कुमुद मिश्रा- अभिनेता कुमुद मिश्रा यांनी अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. या सिनेमामध्येहीते सपोर्टिंग रोल करताना दिसणार आहे. या सिनेमासाठी त्यांनी ३० लाख रुपये मानधन घेतलं आहे.

पवन मल्होत्रा पवन मल्होत्राने या सिनेमासाठी १५ लाख रुपये फी घेतली आहे. पवन मल्होत्रा यांनी सिनेमासह अनेक मालिकांमध्येही काम केलं आहे.

राजेश शर्मा राजेश शर्मा हे नाव कोणासाठीही नवीन नाही. विविधांगी भूमिका साकारुन त्यांनी प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. या सिनेमासाठी त्यांनी २५ लाख रुपये घेतले आहेत.

अक्षयकुमार - या सिनेमात अक्षय कुमार मुख्य भूमिका साकारत असून या सिनेमासाठी प्रचंड जास्त मानधन घेतलं आहे. विशेष म्हणजे अक्षयने जवळपास मानधनाच्या सगळ्या मर्यादा मोडीत काढल्याचं एकंदरीत दिसून येतं. या सिनेमासाठी अक्षयने ११० कोटी रुपये घेतल्याचं म्हटलं जातं आहे.