Bhool Bhulaiyaa 2 साठी कार्तिक आर्यनने घेतले कोट्यावधी रूपये, इतरांचं किती आहे मानधन?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 11:16 AM2022-05-05T11:16:34+5:302022-05-05T11:24:10+5:30

Bhool Bhulaiyaa 2 : 'भूल भुलैय्या २' या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. अशात या सिनेमासाठी कोणत्या कलाकारांनी किती मानधन घेतलं हे जाणून घेऊया...

कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) स्टारर 'भूल भुलैय्या २' सिनेमा रिलीज होण्याची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. हा सिनेमा १४ वर्षाआधी आलेल्या अक्षय कुमारचा सुपरहिट सिनेमा भूल भुलैय्याचा सीक्वल आहे. या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. अशात या सिनेमासाठी कोणत्या कलाकारांनी किती मानधन घेतलं हे जाणून घेऊया...

कार्तिक आर्यन भूल भुलैया २ चा मुख्य अभिनेता आहे. ज्यात त्याने रूहान रंधावा म्हणजे रूही बाबाची भूमिका साकारली आहे. रिपोर्टनुसार, रूह बाबाची भूमिका साकारण्यासाठी कार्तिकने १५ कोटी रूपये मानधन घेतलं आहे.

भूल भुलैया २ सिनेमाच्या माध्यमातून कियारा अडवाणी आणि कार्तिक आर्यन ही जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे. सिनेमात कियाराने रीत ठाकूर नावाची भूमिका साकारली आहे. पडद्यावर मंजुलिकाची भूमिका साकारण्यासाठी अभिनेत्रीने २ कोटी रूपये घेतल्याचं समजते.

बॉलिवूडच्या सर्वात खास अभिनेत्रींपैकी एक तब्बू सुद्धा भूल भुलैय्या २ मध्ये दिसत आहे. भूल भुलैय्या २ मध्ये तब्बू कनिका शर्मा नावाची भूमिका साकारत आहे. या भूमिकेसाठी तब्बूने २ कोटी रूपये घेतल्याचे सांगितलं जात आहे.

पहिल्या सिनेमातही राजपाल यादवच्या छोट्या पण मजेदार भूमिकेने खूप मजा आणली होती. सीक्वलमध्येही राजपाल यादव धमाल करणार आहे. छोटा पंडीत ही भूमिका साकरण्यासाठी राजपालने १.२५ कोटी रूपये घेतल्याचं समजते.

संजय मिश्रा यांची या सिनेमात महत्वाची भूमिका आहे. संजय मिश्रा यांचं कॉमेडीचं टायमिंग कुणासाठी नवीन नाही. ते पडद्यावर आले की मजा येते. त्यांनी या सिनेमातील भूमिकेसाठी ७० लाख रूपये मानधन घेतलं.

टीव्ही मालिकांमध्ये आपल्या भूमिकांनी लोकांच्या मनात घर केलेला अभिनेता अमर उपाध्याय या सिनेमात तब्बूच्या पतीची भूमिका साकारत आहे. या भूमिकेसाठी त्याला ३० लाख रूपये देण्यात आले.

प्रसिद्ध अभिनेते मिलिंद गुणाजी हेही बऱ्याच दिवसांनी मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. ते भूल भुलैया २ मध्ये महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांनी भूमिकेसाठी ५ ते १० लाख रूपये घेतल्याचे समजते.