दृश्यममधला सस्पेन्स खतरनाक वाटला होता का?; मग, 'हे' सात रहस्यमय सिनेमे तुम्हाला खिळवून ठेवतील!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2023 10:20 AM2023-08-12T10:20:55+5:302023-08-12T11:12:08+5:30

अभिनेता अजय देवगण, अभिनेत्री तब्बू , श्रिया सरन यांचा ‘दृश्यम’ हा सिनेमा चांगलाच गाजला होता. थ्रिलर ड्रामा असलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमावला होत्या. मात्र याही पेक्षा जास्त सस्पेन्स असलेले काही सिनेमा आहेत.

दृश्यममध्ये चौथी नापास असलेला विजय आणि त्याच्या कुटुंबाची कथा चाहत्यांना प्रचंड भावली होती. त्यामुळे या सिनेमाने बॉक्स ऑफिस गाजवलं होतं. पण तुम्हाला माहिती आहे का दृश्यमपेक्षा जास्त सस्पेन्स असलेले आणखी ७ सिनेमे आहेत जे पाहून तुमचं डोकं चक्रावून जाईल.

सेक्शन ३७५' हा एक कोर्टरूम ड्रामा आहे. उच्च न्यायालयात बलात्काराच्या प्रकरणावर सुनावणी होते.. मात्र सिनेमातील सस्पेन्स शेवटपर्यंत संपत नाही.. यात अक्षय खन्ना आणि रिचा चड्ढा यांच्या मुख्य भूमिका आहेत.

अभिनेता आमिर खान, करिना कपूर आणि राणी मुखर्जी यांचा तलाश हा सिनेमा देखील सस्पेन्सनी भरलेला आहे. एका मर्डर मिस्ट्रीची केस सांभाळणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचा वैयक्तिक संघर्ष यात दाखवण्यात आला आहे.

आयुषमान खुराणा राधिका आपटे आणि तब्बू यांच्या ‘अंधाधुन’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. आयुषमान खुराणाने या चित्रपटात एका दृष्टिहिन संगीतकाराची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील आयुषमान, राधिका आणि तब्बू या तिघांच्या अभिनयाला प्रेक्षकांची दाद मिळाली होती. सिनेमाला 3 राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

विद्या बालनच्या सुपरहिट सिनेमांपैकी एक असलेला कहानी. विद्या आणि नवाजुद्दीन सिद्धिकी यांच्या कहानी हा एक सस्पेन्स थ्रिलर सिनेमा आहे. कहानी चित्रपटात विद्या बालनने एका गरोदर महिलेची भुमिका निभावली होती. ज्यामध्ये विद्या आपल्या पतीच्या शोधात लंडनहून कोलकातामध्ये येते.विद्याला या चित्रपटासाठी अनेक अॅवॉर्डदेखील मिळाले होते.

मुंबईचा 60 च्या दशकातला सिरिअल किलर 'रमन राघव'पासून प्रेरित 'रमन राघव 2.0' हा एक सिरिअल किलरवर चित्रपट आहे. चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकीव्यतिरिक्त विकी कौशल मुख्य भुमिकेत आहे.

इरफान खान यांचा उत्कृष्ट अभिनय, सादरीकरण, परफॉर्मन्स असलेला मदारी हा सिनेमा एका मुलाच्या किडनॅपिंगवर आधारित आहे. असून इरफान यांनी यात एका सामान्य नागरिकाची भूमिका केली आहे. काही राजकीय नेते त्याच्या मुलाला घेऊन जातात. त्यामुळे इरफान मग मुख्यमंत्र्याच्या आठ वर्षांच्या मुलालाच किडनॅप करतो. सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही पण सिने परिक्षकांनी सिनेमाचं खूप कौतुक केलं.

अनुराग कश्यपचा अग्ली हा सस्पेन्स थ्रिलर सिनेमा आहे. यात रोनित रॉय, राहुल भट्ट, विनीत कुमार, गिरीश कुलकर्णी यांच्या प्रमुख भुमिकेत आहेत.