हृतिक रोशनची ही हीरोईन वयाच्या ३९ व्या वर्षीच बनली होती आजी, एकेकाळी रंगली होती अफेअरची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 14:26 IST2025-09-07T14:22:55+5:302025-09-07T14:26:41+5:30

Barbara Mori: जगभरात भारतीय चित्रपटसृष्टीची ओळख निर्माण करणाऱ्या बॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्यासाठी देशाचा कानाकोपऱ्याबरोबरच परदेशातूनही अनेक कलाकार येत असतात. त्यातील काही जणांना खूप यश मिळतं. तर काही जणं कालौघात विस्मरमात जातात. आज आपण अशाच एका अभिनेत्रीची माहिती घेणार आहोत. या अभिनेत्रीने हृतिक रोशन सोबतच्या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. पुढे ती वयाच्या अवघ्या ३९ व्या वर्षी आई झाली होती.

जगभरात भारतीय चित्रपटसृष्टीची ओळख निर्माण करणाऱ्या बॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्यासाठी देशाचा कानाकोपऱ्याबरोबरच परदेशातूनही अनेक कलाकार येत असतात. त्यातील काही जणांना खूप यश मिळतं. तर काही जणं कालौघात विस्मरमात जातात. आज आपण अशाच एका अभिनेत्रीची माहिती घेणार आहोत. या अभिनेत्रीने हृतिक रोशन सोबतच्या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. पुढे ती वयाच्या अवघ्या ३९ व्या वर्षी आई झाली होती.

आम्ही ज्या अभिनेत्रीबाबत बोलत आहोत तिचं नाव आहे बारबरा मोरी. बारबरा मोरी हिने सुमारे १५ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या हृतिक रोशनच्या काईट्स या चित्रपटामधून पदार्पण केलं होतं. या चित्रपटात बारबरा ही हृतिक रोशनसोबत मुख्य भूमिकेमध्ये होती.

बारबरा हिने हृतिकसोबत बॉलिवूडमध्ये दणक्यात पदार्पण केलं असलं तरी ती पुढे बॉलिवूडमध्ये फारशी चमकू शकली नाही. मात्र काईट्स चित्रपटादरम्यान, हृतिक आणि बारबरा यांच्या अफेअरचीही खूप चर्चा झाली होती. मात्र बारबरा तेव्हा रिलेशनशिपमध्ये होती. तसेच ती बॉलिवूडपासूनही दूर गेली होती. त्यामुळे त्यांच्या अफेअरच्या चर्चा फारशा रंगू शकल्या नव्हत्या.

बारबरा मोरी ही १९९६ मध्ये सर्जियो मेयरसोबत रिलेशनमध्ये होती. त्यामधून तिला एक मुलगा झाला होता. त्याचं नाव सर्जियो मेयर मोरी असं आहे. त्याचा जन्म १९९८ मध्ये झाला होता. दरम्यान, उल्लेखनीय बाब म्हणजे बारबरा मोरी ही वयाच्या ३९ व्या वर्षी आजीसुद्धा बनली. २०१६ मध्ये बारबराचा मुलगा सर्जियो याला एक मुलगी झाली. तिचं नाव मिला मेयर सबटिल असं आहे. आता मिला ही ९ वर्षांची असून, बारबरा ही ४७ वर्षांची आहे.

पहिल्या रिलेशनशिपमधून मुलगा झाल्यानंतर बारबरा मोरीचं ब्रेकअप झालं होतं. त्यानंतर २०१६ मध्ये तिने बास्केटबॉलपटू केनेथ राय सिग्मन याच्याशी लग्न केलं होतं. मात्र हे लग्न एक वर्षभरही टिकू शकलं नाही. २०१७ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. तेव्हापासून बारबरा मोरी एकट्याने जीवन जगत आहे.

२०१० मध्ये आलेल्या काईट्स चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी बारबरा मोरी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तसेच ती फॅन्ससोबत आपल्या जीवनातील बऱ्याच गोष्टी शेअर करत असते.