OMG! मुन्नी इतनी जल्दी बडी हो गई...; ‘बजरंगी भाईजान’मधील चिमुकलीचे फोटो पाहून व्हाल थक्क !!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2020 12:16 PM2020-11-17T12:16:51+5:302020-11-17T12:24:02+5:30

‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटाचे नाव घेतले तरी एक चेहरा हमखास आठवतो. तो म्हणजे, चिमुकल्या मुन्नीचा.

‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटाचे नाव घेतले तरी एक चेहरा हमखास आठवतो. तो म्हणजे, चिमुकल्या मुन्नीचा. ‘बजरंगी भाईजान’चे शूटींग केले तेव्हा ही मुन्नी उणीपुरी 7 वर्षांची होती. आता ती इतकी मोठी झाली की, तिचे फोटो पाहून हीच मुन्नी यावर विश्वास बसणार नाही.

होय, मुन्नी अर्थात हर्षाली मल्होत्रा इतक्या वर्षांत ती बरीच बदलली आहे.

हर्षालीने दिवाळी सेलिब्रेशनचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. यात हर्षाली एकदम बदललेली दिसली.

तिचे हे फोटो पाहिल्यानंतर, मुन्नी इतनी जल्दी बडी हो गई... अशा प्रतिक्रिया नेटक-यांनी दिल्या आहेत.

‘बजरंगी भाईजान’ हा चित्रपट करण्याआधी हषार्लीने कुबूल है, लौट आओ तृषा आणि सावधान इंडिया अशा अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे.

‘बजरंगी भाईजान’मधील हषार्ली निरागसपणा आणि तिच्या चेह-यावरचे गोड हसू प्रेक्षकांच्या हृदयात घरच करून गेले होते. या चित्रपटासाठी हषालीर्ची अमाप प्रशंसा झाली होती. स्क्रीन अवार्ड फॉर बेस्ट चाइल्ड आर्टिस्ट पुरस्कारही तिने जिंकला होता.

‘बजरंगी भाईजान’च्या सेटवर हषार्ली रिकाम्या वेळेत सलमान खान व कबीर खान यांच्या मोबाईलमध्ये बार्बी गेम्स तसेच टेबल टेनिस खेळायची.

सुरूवातीला ‘बजरंगी भाईजान’च्या शूटिंगदरम्यान हषार्ली सतत रडायची. सलमानचा फायटिंग सीन वा इमोशनल सीन पाहिला की ती रडू लागायची. इतकेच नाही तर सलमान खानसोबत बोलताना ती प्रचंड लाजायची. पण हळूहळू दोघांतही चांगली मैत्री झाली.

‘बजरंगी भाईजान’च्या शूटिंग दरम्यान मोठ्या आवाजाने हर्षाली घाबरून जायची. त्यावेळी कबीर खान व सलमान खान दोघेही हषार्लीला अन्य गोष्टींमध्ये बिझी ठेवायचे. सीन समजला नाही तर हर्षाली थेट कबीर खान यांच्याकडे जायची आणि त्यांना सीनबद्दल विचारायची.