Chhaava Movie : 'छावा'मधला औरंगजेब खऱ्या आयुष्यात भलताच अबोल, स्वत:च अक्षय खन्ना म्हणालेला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 11:56 IST2025-03-28T11:49:24+5:302025-03-28T11:56:13+5:30
Chhaava Movie :'छावा' चित्रपटातील अक्षय खन्नाच्या कामाचं खूप कौतुक झालं. त्याच्या संदर्भातील अनेक बातम्या समोर आल्या. दरम्यान अभिनेता खऱ्या आयुष्यात खूप अबोल असल्याचे समोर आले आहे.

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' सिनेमा १४ फेब्रुवारी रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला. तेव्हापासून चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत चित्रपटाने अनेक विक्रम मोडीत काढले आहेत.
छावा चित्रपटात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेत आहे. तर रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारलीय. तसेच या चित्रपटात औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्ना पाहायला मिळाला.
छावा चित्रपटातील अक्षय खन्नाच्या कामाचं खूप कौतुक झालं. त्याच्या संदर्भातील अनेक बातम्या समोर आल्या. दरम्यान अभिनेता खऱ्या आयुष्यात खूप अबोल असल्याचे समोर आले आहे.
संतोष जुवेकरनेही अक्षय खन्नासोबतचा अनुभव शेअर केला. म्हणाला की, त्याच्याशी बोलायची इच्छाच झाली नाही. पण अक्षय स्वतःच सेटवर फारसा बोलत नाही.
अक्षय खन्ना मीडिया आणि चाहत्यांपासून दूर राहणे पसंत करतो. त्याला प्रसिद्धी आवडत नाही. त्याला अलिप्त राहायला आवडते.
अक्षय खन्नाने एका मुलाखतीत सांगितले होते की, मी फक्त चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी मीडियासमोर येतो. बाकी वेळ मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात रमतो. मी अनेक चित्रपट पाहतो, भरपूर वाचन करतो. कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ व्यतित करतो. झोपही पूर्ण घेतो.
वाईट चित्रपट करण्यापेक्षा घरी बसणे चांगले. मी माझ्या कारकीर्दीबाबत समाधानी आहे, असेही अक्षय खन्ना म्हणाला होता.
इतर अभिनेत्यांप्रमाणे निर्मिती किंवा दिग्दर्शनात अक्षय खन्नाला इंटरेस्ट नसल्याचे तो सांगतो. तसेच तो कधीच वादग्रस्त विधान करताना दिसत नाही. तो सोशल मीडियावरदेखील सक्रीय नाही.