वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री कान्समध्ये झळकली, ग्लॅमरस लूकने वेधलं जगाचं लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 18:11 IST2025-05-17T17:54:51+5:302025-05-17T18:11:43+5:30
लापता लेडीज सिनेमातील 'फुलकुमारी'नंतर आणखी एका बॉलिवूड अभिनेत्रीने कमी वयात कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली आहे. कोण आहे ही अभिनेत्री

सध्या जगभरात कान्स फिल्म फेस्टिव्हलची चांगलीच चर्चा आहे. हॉलिवूडपासून बॉलिवूडपर्यंत अनेक सेलिब्रिटी या फेस्टिव्हलला हजेरी लावत आहेत
कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये यावेळी एक २२ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्री सहभागी झाली आहे. ही अभिनेत्री म्हणजे अनुष्का सेन.
अनुष्का सेन पहिल्यांदाच कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली आहे. अनुष्काच्या ग्लॅमरस लूकने जगाचं लक्ष तिच्याकडे वेधलं गेलंय
जांभळ्या रंगाच्या फ्लोरस गाऊनमध्ये अनुष्काने कान्स फिल्म फेस्टिव्हलला हजेरी लावली. रेड कार्पेटमध्ये अनुष्काने फोटोशूटसाठी खास पोज दिल्या.
याशिवाय अनुष्काने रेड कार्पेटवर कोरिअल हार्ट इमोजी असलेलं साइन बनवत खास पोज दिली. अवघ्या २२ व्या वर्षी जगातल्या दिग्गज व्यक्तींसोबत अनुष्काला कान्समध्ये झळकण्याची संधी मिळाली आहे
टीव्ही इंडस्ट्रीपासून अनुष्काने अभिनय प्रवासाला सुरुवात केली. अनुष्काने दिल, दोस्ती, डिलेमा या वेबसीरिजमध्ये साकारलेल्या अभिनयाचं खूप कौतुक झालं
अनुष्का सेनच्या ग्लॅमरस लूकने तिने तिच्या चाहत्यांची पसंती मिळवली आहे. आत्मविश्वास आणि मेहनतीच्या जोरावर अनुष्काने २२ व्या वर्षी कान्समध्ये केलेलं पदार्पण लक्षवेधी ठरलंय