बोल्डनेसच्या बाबतीत अरबाजची girlfriend पडतीये मलायकावर भारी; बाथटबमध्ये केलं ग्लॅमरस फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2021 03:39 PM2021-12-19T15:39:52+5:302021-12-19T15:44:28+5:30

Giorgia andriani:जॉर्जिया सध्या बॉलिवूडमध्ये नशीब आजमावत आहे. अलिकडेच ती मिका सिंगच्या 'रुप तेरा मस्ताना'मध्ये झळकली होती. तसंच 'कॅरोलिन अॅण्ड कामाक्षी' या वेबसीरिजमध्येही ती झळकली आहे.

बॉलिवूड अभिनेता अरबाज खान अनेकदा त्याच्या प्रोफेशन लाइफपेक्षा पर्सनल लाइफमुळे चर्चेत येत असतो. यात खासकरुन त्याच्या गर्लफ्रेंडमुळे जॉर्जियामुळे (Giorgia Andriani) त्याची चर्चा होत असते.

मलायका अरोरापासून विभक्त झाल्यानंतर अरबाज जॉर्जियाला डेट करत आहे. विशेष म्हणजे या दोघांमध्ये तब्बल २२ वर्षांचं अंतर आहे.

अरबाजच्या गर्लफ्रेंडचं नाव जॉर्जिया एंड्रियानी असं असून ती एका इटालियन मॉडेल, अभिनेत्री आहे.

अरबाज आणि जॉर्जियाचं नातं जगजाहीर झालं आहे. यात अरबाज आणि जॉर्जियानेही सर्वासमक्ष आपलं नातं मान्य केलं आहे.

जॉर्जिया कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावर सक्रीय असून अनेकदा तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

अलिकडेच तिने बाथटबमध्ये बसून फोटोशूट केलं आहे. तिच्या या फोटोची नेटकऱ्यांमध्ये कमालीची चर्चा रंगली आहे.

सौंदर्याच्या बाबतीत अनेकांवर मात करणारी जॉर्जिया तिच्या बोल्डनेसमुळे कायमच चर्चेत असते. त्यामुळे अनेकदा तिची आणि मलायकाची सोशल मीडियावर तुलना होताना पाहायला मिळतं.

जॉर्जिया सध्या बॉलिवूडमध्ये नशीब आजमावत आहे. अलिकडेच ती मिका सिंगच्या 'रुप तेरा मस्ताना'मध्ये झळकली होती. तसंच 'कॅरोलिन अॅण्ड कामाक्षी' या वेबसीरिजमध्येही ती झळकली आहे. यात तिने एका इटालियन एजंटची भूमिका साकारली होती.

जॉर्जिया लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यु करणार आहे. तिच्या या आगामी चित्रपटात ती अभिनेता श्रेयस तळपदेसोबत स्क्रीन शेअर करणार असल्याचं म्हटलं जात आहे.