रणबीर कपूर शिवाय जुहूमध्ये सलूनच्या बाहेर दिसली आलिया भट, पहा तिचे हे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2019 13:20 IST2019-03-30T13:17:57+5:302019-03-30T13:20:03+5:30

नुकताच आलिया भटला तिच्या 'राझी' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. याव्यतिरिक्त आलिया रणबीर कपूरसोबतच्या रिलेशनशीपमुळे चर्चेत आली.

आलिया जुहूमध्ये सलूनमधून बाहेर पडताना दिसली. यावेळी ती साध्या सलवार सूटमध्ये दिसली.

सध्या आलियाला एथनिक लूक खूप आवडतो आहे. तिचा आगामी चित्रपट 'कलंक'मधील लूकदेखील प्रेक्षकांना खूप भावतो आहे.

आलिया तिचा आगामी चित्रपट 'कलंक'च्या प्रमोशनमध्ये खूप व्यग्र आहे. या चित्रपटात आलिया शिवाय संजय दत्त, वरूण धवन, सोनाक्षी सिन्हा, आदित्य रॉय कपूर व माधुरी दीक्षित मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

'कलंक'नंतर आलिया रणबीर कपूर व अमिताभ बच्चन यांच्यासोबत ब्रह्मास्त्रमध्ये झळकणार आहे.

'ब्रह्मास्त्र' चित्रपटात रणबीर व आलिया यांची केमिस्ट्री रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत.