अनुष्का शर्मा की विराट कोहली? कोण जास्त श्रीमंत? जाणून घ्या 'विरुष्का'चं नेटवर्थ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 01:51 PM2023-12-11T13:51:34+5:302023-12-11T14:06:52+5:30

सगळ्यांचे लाडके 'विरुष्का' लक्झरियस आयुष्य जगतात. भारताचा स्टार क्रिकेटर असलेला विराट कोट्यवधींचा मालक आहे. तर अनुष्का शर्माही बॉलिवूड चित्रपटांतून कोटी रुपयांची कमाई करते.

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे लोकप्रिय सेलिब्रिटी कपल आहेत. २०१७मध्ये विराट आणि अनुष्काने लग्नाच्या बेडीत अडकत चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. आज त्यांच्या लग्नाचा सहावा वाढदिवस आहे.

विराट-अनुष्काकडे आदर्श जोडी म्हणून पाहिलं जातं. रन मशीन असलेल्या विराटच्या कठीण काळात अनुष्का त्याच्याबरोबर अगदी खंबीरपणे उभं राहिली होती. विराटही अनेकदा स्टेडियमवर त्याच्या कृतीतून पत्नीबद्दलचं प्रेम व्यक्त करताना दिसतो.

त्यांच्या जोडीचे लाखो चाहते आहेत. एकमेकांबद्दल असलेल्या प्रेमामुळे आणि कठीण काळात जोडीदाराला दिलेली साथ यामुळे विरुष्का ही जोडी कित्येकांसाठी आदर्श आहे.

सगळ्यांचे लाडके 'विरुष्का' लक्झरियस आयुष्य जगतात. भारताचा स्टार क्रिकेटर असलेला विराट कोट्यवधींचा मालक आहे. तर अनुष्का शर्माही बॉलिवूड चित्रपटांतून कोटी रुपयांची कमाई करते.

caknowledgeने दिलेल्या माहितीनुसार, अनुष्का शर्मा एकूण ३५ मिलियन डॉलरची मालकीण आहे. भारतीय रुपयानुसार, अनुष्काकडे २५५ कोटींची संपत्ती आहे.

अनुष्का दर महिन्याला जवळपास १ कोटी कमावते. तिचं स्वत:चं मुंबईत ९ कोटींचं घर आहे. याशिवाय BMW, Range Rover आणि Mercedes यांसारख्या महागड्या गाड्याही तिच्याकडे आहेत.

तर, क्रिकेटर विराट कोहली संपतीच्या बाबतीतही किंग ठरला आहे. विराट एकूण १२७ मिलियन डॉलर म्हणजेच १०४६ कोटींचा मालक आहे.

विराट ब्रँड एंडोर्समेंटमधून कोट्यवधी रुपये कमावतो. त्याचं स्वत:चं 'वन8 कम्यून' हे रेस्टॉरंटदेखील आहे.

विराट आणि अनुष्का म्हणजेच 'विरुष्का' एकूण १३०० कोटींचे मालक आहेत.

विराट आणि अनुष्काला एक 'वामिका' ही मुलागी आहे. ११ जानेवारी २०२१ला अनुष्काने त्यांच्या लाडक्या परीला जन्म दिला. आता अनुष्का दुसऱ्यांदा गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.