अनुष्का शर्माच्या 'चकदा एक्सप्रेस' चित्रपटाचे शूटिंग संपलं, झुलन गोस्वामीसोबत केक कापून साजरा केला आनंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2022 17:41 IST2022-12-27T17:41:23+5:302022-12-27T17:41:23+5:30

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'चकदा एक्सप्रेस'चे शूटिंग पूर्ण झाले आहे, ज्याचे फोटो तिने तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोंमध्ये अनुष्कासोबत झुलन गोस्वामीही दिसत आहे आणि दोघी एकत्र केक कापताना दिसत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
फोटोंमध्ये, अनुष्का शर्मा सेटवर संपूर्ण टीमसोबत मस्ती करताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोंमध्ये अनुष्का शर्मा भारतीय क्रिकेट टीमच्या यूनिफॉर्ममध्ये दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
हे फोटो शेअर करताना अनुष्का शर्माने लिहिले की, 'चकदा एक्सप्रेसचे शूटिंग संपले आहे. झुलन गोस्वामीचे आभार!' (फोटो: इंस्टाग्राम)
'चकदा एक्सप्रेस' हा चित्रपट इतिहासातील सर्वात वेगवान महिला वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेल्या झुलन गोस्वामीचा बायोपिक आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
अनुष्का शर्माचा चित्रपट 'चकडा एक्सप्रेस' OTT प्लॅटफॉर्म Netflix वर पाहता येणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)