अनु मलिकची लेकी करतीये दिग्गज अभिनेत्रींवर मात; 'या' क्षेत्रात आहे कार्यरत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 05:47 PM2023-04-20T17:47:20+5:302023-04-20T17:52:28+5:30

Anu malik: अनमोल आणि अदा अशी अनु मलिकच्या लेकींची नावं असून बऱ्याचदा अनु त्यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो.

उत्तम गायक, संगीतकार, संगीत दिग्दर्शक अनु मलिक याने बॉलिवूडमध्ये त्याचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.

आपल्या गाण्यांमुळे चर्चेत येणारा अनु मलिक यावेळी त्याच्या लेकींमुळे चर्चेत येत आहे.

अनु मलिकला दोन लेकी असून त्यादेखील कलाविश्वात सक्रीय आहे.

अनमोल आणि अदा अशी अनु मलिकच्या लेकींची नावं असून बऱ्याचदा अनु त्यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो.

अनु मलिकने अंजली वसुदेव भट्ट यांच्याशी लग्न केलं आहे.

अनु मलिक यांची मोठी लेक अनमोल २८ वर्षांची आहे. तिने इंग्लंडमधून तिचं बीएससी कॉम्प्युटर सायन्स आणि बिझनेसचं शिक्षण घेतलं आहे.

तर अनु मलिकची दुसरी लेक अदा हिने न्यूयॉर्कमधून फॅशन डिझायनिंगचं शिक्षण घेतलं आहे.

अनमोलला संगीताची विशेष आवड असून सध्या ती बॉलिवूडमध्ये म्युझिक इंडस्ट्रीमध्येच काम करत आहे.

अनमोलने मर्दानी ते दम लगा के हईशा या सिनेमासाठीही काम केलं आहे.

दुसरीकडे अदा उत्तम फॅशन डिझायनर असून तिने अनेक रॅम्प शो केले आहेत.