७५ मुलींबरोबर डेटिंग अन् २ वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी लग्न; भारतासाठी क्रिकेट खेळायचा 'हा' अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2024 11:20 AM2024-02-06T11:20:31+5:302024-02-06T11:25:31+5:30

क्रिकेटचं मैदान गाजवल्यानंतर केली बॉलिवूडमध्ये एन्ट्री, लग्नाआधी ७५ अभिनेत्रींना 'या' अभिनेत्याने केलं होतं डेट

सेलिब्रिटी आणि त्यांच्या आयुष्याबद्दल जाणून घेण्यात चाहत्यांना नेहमीच रस असतो. काही कलाकारही करिअरपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळेच जास्त चर्चेत असतात.

अभिनेता अंगद बेदीदेखील अशाच कलाकारांपैकी एक आहे. लव्ह लाइफमुळे कायमच चर्चेत आलेल्या अंगदचा आज वाढदिवस आहे.

अंगदने २००४ साली काया तरण या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर 'फालतू', 'उंगली', 'पिंक', 'डियर जिंदगी', 'टायगर जिंदा है' अशा अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये त्याने काम केलं.

पण, अभिनेता होण्याआधी अंगद एक क्रिकेटर होता. अंडर १९ टीममधून त्याने भारतासाठी क्रिकेट खेळलं होतं.

अंगदचे वडील बिशन सिंग बेदीही भारतीय क्रिकेटर होते. क्रिकेटचं मैदान गाजवल्यानंतर अंगदने त्याची पावलं मॉडेलिंगकडे वळवली.

अंगद करिअरपेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेच जास्त चर्चेत होता. लग्नाआधी ७५ मुलींना डेट केल्याचा खुलासा अंगदने मुलाखतीत केला होता.

२०१८ साली अंगदने बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपियाशी लग्न करत संसार थाटला. पण, अंगदशी लग्न करण्याआधीच नेहा गरोदर होती.

लग्नानंतर सहा महिन्यांतच अंगद आणि नेहा आईबाबा झाल्यामुळे चर्चेत आले होते. नेहा ही अंगदपेक्षा २ वर्षांनी मोठी आहे.

आता नेहा आणि अंगदला मेहेर आणि गुरीक ही दोन मुले आहेत.