All Time Best Holi Songs: यंदाच्या होळीत वाजवा सिनेमातली 'ही' खास गाणी; लिस्ट आताच सेव्ह करुन ठेवा
By देवेंद्र जाधव | Updated: March 2, 2026 15:18 IST2026-03-02T14:56:56+5:302026-03-02T15:18:06+5:30
होळी आणि रंगपंचमीची सध्या धामधुम आहे. यंदाच्या होळीत ही खास गाणी वाजवून धुळवडीचा आनंद आणखी द्विगुणित करा

लय भारी सिनेमातलं आला होळीचा सण लय भारी हे गाणं चांगलंच गाजलं. रितेश देशमुख, जिनिलीया आणि राधिका आपटे यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं आजही सर्वांचं फेव्हरेट आहे

होळी म्हटली की अभिनेत्री संध्या यांच्यावर चित्रित झालेलं जा रे हट नटखट हे होळी विशेष गाणं चांगलंच आठवतं. या गाण्यात संध्या यांनी केलेला डान्स आजही सर्वांच्या लक्षात आहे

सध्याच्या काळात तरुणाईला आवडणारं गाणं म्हणजे लेट्स प्ले होली. वक्त सिनेमातील हे गाणं होळीचा नवा अंदाज सर्वांसमोर आणतं.

होली खेले रघुवीरा हे बागबान सिनेमातलं गाणं होळीच्या प्लेलिस्टमध्ये टॉपवर असेल यात शंका नाही. अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनींची जोडी प्रचंड गाजली.

शोले सिनेमातलं होली के दिन दिल खिल जाते है हे सर्वांचं ऑल टाईम फेव्हरेट गाणं. धर्मेंद्र आणि हेमा मालिनींचा या गाण्यातील डान्स चांगलाच गाजला. प्रत्येक पिढीला हे गाणं आपलंंसं वाटतं.

नव्या पिढीची एनर्जी आणि बदलता काळ डोळ्यासमोर ठेऊन वॉर सिनेमातलं जय जय शिवशंकर हे गाणं थिरकायला भाग पाडतं. हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफचा जबरदस्त डान्स बघायला मिळतो.

सिलसिला सिनेमातलं रंग बरसे भिगे चुनरवाली हे गाणं चांगलंच गाजलं. रेखा आणि अमिताभ बच्चन यांची रोमँटिक केमिस्ट्री या गाण्यात सर्वांना आवडते.

















