आलिया-रणबीरचा 'ब्रह्मास्त्र' या ७ सिनेमांवर पडला भारी, मोडले आतापर्यंतचे सगळे मोठे रेकॉर्ड्स

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2022 03:11 PM2022-09-13T15:11:01+5:302022-09-13T15:16:05+5:30

Brahmastra Movie: ब्रह्मास्त्र चित्रपट ९ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.

Brahmastra Movie: ब्रह्मास्त्र चित्रपट ९ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.

ब्रह्मास्त्र चित्रपट ९ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.

आतापर्यंत ब्रह्मास्त्र चित्रपटाने ७ मोठे रेकॉर्ड्स मोडले आहेत.

ब्रह्मास्त्रने रिलीजच्या पहिल्या आठवड्यात दमदार कमाई करून २०० कोटी क्लबमध्ये प्रवेश करून सलमान खानच्या सुलतान चित्रपटाचा विक्रम मोडला आहे.

आगाऊ तिकिट विक्रीच्या बाबतीत या चित्रपटाने यावर्षी सर्वात जास्त अॅडव्हान्स बुकिंग झालेल्या भुलभुलैय्या २ ला मागे टाकले आहे.

इतकेच नाही तर रणबीर कपूरच्या सर्वात मोठा ओपनर असलेला ‘संजू’चा रेकॉर्ड ब्रह्मास्त्रने मोडला आहे.

ब्रह्मास्त्र चित्रपट वर्ल्ड वाइड ओपनिंग वीकेंडला आंतरराष्ट्रीय बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा नंबर १ चित्रपट ठरला आहे.

ब्रह्मास्त्र हा तामिळनाडूमध्ये एकाच दिवसात मोठी कमाई करणारा पहिला बॉलिवूड चित्रपट ठरला आहे.

परदेशातूनही ब्रह्मास्त्र चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळत असून अमेरिका, ऑस्ट्रेलिया देशांमध्ये चित्रपटाची क्रेझ दिसून येत आहे.

ब्रह्मास्त्र चित्रपटाने पहिल्या दिवसाच्या कलेक्शनमध्ये ‘संजू’, ‘टायगर जिंदा है’ आणि ‘धूम ३’ ला मागे टाकले. रणबीर कपूर आणि आलिया भटच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाने जगभरात ९००० स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे.